इंटरनेट बंद करण्यात भारत जगात टॉपर, एका वर्षात इतक्या वेळा झाले इंटरनेट ब्लॉक

इंटरनेट ही सध्याच्या काळाची गरज आहे. लॉकडाऊनमध्ये तर इंटरनेट हा आपल्यापैकी प्रत्येकाच्याच आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. पण 2021 मध्ये सर्वाधिक इंटरनेट शटडाऊन करणा-या देशांच्या यादीत भारत जगात अव्वल स्थानी पोहोचला आहे. अॅक्सेस नाऊ(Access Now) या संस्थेने जारी केलेल्या The return of digital authoritarianism: internet shutdowns in 2021 या अहवालात ही माहिती समोर आली आहे.

(हेही वाचाः अजित पवार म्हणतात, एक महिना कठीण आहे, काळजी घ्या)

इतक्या वेळा इंटरनेट ब्लॉक

2021 मध्ये जगातील 34 देशांमध्ये सुमारे 182 वेळा इंटरनेट ब्लॉक झाले होते. त्यापैकी एकट्या भारतात सर्वाधिक म्हणजेच 106 वेळा इंटरनेट बंद करण्यात आले. भारतानंतर म्यानमारमध्ये 15, इराण आणि सुदानमध्ये 5, क्युबा आणि जॉर्डन येथे 4, तर इथिओपिया आणि युगांडा या देशांत प्रत्येकी 3 वेळा इंटरनेट बंद करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. भारत सलग चौथ्यांदा या यादीत प्रथम स्थानी आला असल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.

या भागात सर्वाधिक इंटरनेट शटडाऊन

भारतातील 106 पैकी 85 वेळा जम्मू-काश्मिरमध्ये इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली. दहशतवादी कारवायांची चाहूल लागल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून इंटरनेट बंद करण्यात आल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

इतके तास झाले शटडाऊन

भारतातील केंद्र, राज्य आणि जिल्हा पातळीवरुन देण्यात आलेल्या आदेशानुसार, भारतात 2021 मध्ये एकूण 1 हजार 157 तास इंटरनेट शटडाऊन झाले. याचा देशभरातील 59 कोटी नागरिकांना फटका बसल्याचे टॉप-10 व्हीपीएन या रिसर्च ग्रुपने केलेल्या अहवालात म्हटले आहे. तसेच या कारणामुळे भारताला 58.3 कोटी डॉलर्सचे नुकसान झाले असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here