‘या’ चुका केल्यामुळे भारतातील १८ लाख व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट्स बंद

व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक हे विविध अ‍ॅप्स सामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाले आहेत. व्हॉट्सअ‍ॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. जगभरातील लाखो युजर्स दैनंदिन जीवनात या अ‍ॅपचा वापर करतात. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतात १८ लाखांहून जास्त व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट्स मार्च महिन्यात बॅन करण्यात आले आहेत. नवीन आयटी रुल्स २०२१ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे असे कंपनीने स्पष्ट केले आहे. भारतात एकाचवेळी तब्बल १८ लाख अकाउंट्स नेमके का ब्लॉक करण्यात आले आहेत याविषयी जाणून घ्या…

( हेही वाचा : गुगल सर्चमधून हटवा तुमची खासगी माहिती )

व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, मार्च महिन्यात १८ लाख ५ हजार व्हॉट्सअ‍ॅप बॅन करण्यात आले आहेत. अपशब्द, शिवीगाळ, फेक माहिती पोहोचवणाऱ्या अकाउंट्सवर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच जे अकाउंट्स युजर्सकडून रिपोर्ट करण्यात आले आहेत अशा अकाउंटला सुद्धा बॅन करण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर या चुका करू नका…

  • व्हॉट्सअ‍ॅपवर एखाद्या युजर्सची तक्रार केल्यास संबंधित खाते बॅन होऊ शकते.
  • युजर्सनी बेकायदेशीर, अश्लील, बदनामीकारक, धमकी देणारे, त्रास देणारे, द्वेष करणारे मेसेज करू नये यामुळे अकाउंट बॅन होण्याची शक्यता असते.
  • व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील चित्रफित (पॉर्न क्लिप) शेअर करण्यावर बंदी घातली आहे. अशी क्लिप शेअर केल्यास युजर्स अडचणीत येऊ शकतात.
  • GBWhatsapp, Whatsapp Delta, Whatsapp Plus यासारख्या तृतीय पक्षीय अ‍ॅप्सचा वापर केल्याने तुमचे व्हॉट्सअ‍ॅप खाते कायमचे बंद होऊ शकते. अशा थर्ड पार्टी अ‍ॅप्समुळे युजर्सचा वैयक्तिक डेटा लीक होतो. त्यामुळे अशा अ‍ॅप्सपासून दूर राहण्याचा सल्ला कंपनीने युजर्सला दिला आहे.
  • व्हॉट्सअ‍ॅप कोणीही हॅक करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाऊ शकते. यामुळे अटक व दंडही आकाराला जाऊ शकतो.
  • फेक न्यूज पाठवू नका प्रत्येक मेसेज फॉरवर्ड करताना त्याची सत्यता तपासून घ्या. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर फेक अकाउंट बनवून लोकांना त्रास देऊ नका यामुळे तुमचे खाते बॅन होऊ शकते.
  • स्पॅम म्हणजे मेसेज पाठवण्यासाठी ब्रॉडकास्टिंग लिस्ट किंवा ग्रुप तयार करणे. ऑटो-मेसेजिंग, ऑटो-डायलिंग इत्यादी बेकायदेशीर किंवा अयोग्य संप्रेषणात असल्याचे आढळल्यास तुमचे WhatsApp Account देखील बंद केले जाईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here