DNEG समूहाच्या दृश्य मनोरंजन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नवसंकल्पनांना गती देण्यासाठी $२०० मिलियनच्या भांडवलाचे पाठबळ

54
DNEG समूहाच्या दृश्य मनोरंजन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नवसंकल्पनांना गती देण्यासाठी $२०० मिलियनच्या भांडवलाचे पाठबळ

लंडन येथे मुख्यालय असलेली व दृश्य मनोरंजन तंत्रज्ञान आणि सेवांच्या क्षेत्रातील जागतिक स्तरावरील अग्रगण्य कंपनी DNEG (“द ग्रुप”) ने मंगळवार (२ जुलै २०२४) युनायटेड अल साकेर ग्रुप (“UASG”) आपल्या समूहामध्ये $२ बिलियन अतिरिक्त उद्योगमूल्यानुसार $२०० मिलियनची धोरणात्मक गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. (DNEG)

DNEG समूहाकडे व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX) विभागामध्ये आघाडीचे स्थान भूषविण्यास साजेसा असा कल्पकतेचा २५ वर्षांचा सातत्यपूर्ण पूर्वानुभव व भक्कम नफेशीर वाढीचा इतिहास आहे. मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील इतर सर्व भागांप्रमाणेच DNEG समूह ज्या बाजारपेठेमध्ये कार्यरत आहे ती बाजारपेठही वेगवान बदलांना सामोरी जात आहे. UASG ने केलेल्या गुंतवणुकीमुळे केवळ व्हिज्युअल इफेक्ट्स पुरविणारी कंपनी ते सर्व प्रकारच्या कन्टेन्टची निर्मिती करणारी कंपनी इथपर्यंतची प्रगती साधण्यासाठी अभिनव संकल्पना राबविण्याच्या आणि वैविध्यपूर्णता जपण्याच्या DNEG समूहाच्या धोरणाला गती मिळेल व त्यातून तंत्रज्ञान आणि सर्जनशील नेतृत्वातील सातत्याची हमी मिळेल. (DNEG)

● अबु धाबी स्थित गुंतवणूकदार युनायटेड अल साकेर समूह DBEG समूहासाठी $२ बिलियनच्या अतिरिक्त उद्योगमूल्यानुसार $200 मिलियन्सची गुंतवणूक करणार.
● गुंतवणुकीमुळे VFX उद्योगक्षेत्रात आपले अग्रस्थान राखण्याच्या आणि समूहाच्या उपक्रमांना इतरही वेगवेगळ्या क्षेत्रांत विस्तारित करण्याच्या DNEG समूहाच्या धोरणाला गती मिळणार.
● नव्या भांडवलाचे बळ मिळणाऱ्या विभागांमध्ये समावेश असलेल्या प्राइम फोकस स्टुडिओजकडून कन्टेन्ट निर्मितीमध्ये अधिक गुंतवणूक केली जाणार.
● गुंतवणुकीमुळे उद्योगक्षेत्रातील सर्वाधिक समावेश AI सुसज्ज CGI क्रिएटर विकसित करत असलेल्या ब्रह्मा या नव्या तंत्रज्ञान विभागाला पाठबळ मिळणार.
● DNEG समूह अबु धाबीमध्ये व्हिज्युअल एक्स्पीरियन्स हब निर्माण करणार, ज्यातून रोजगारनिर्मितीस चालना मिळणार.

विशेषत :
  • DNEG समूह ब्रह्मा या आपल्या तंत्रज्ञान शाखेला संपूर्णपणे सक्रिय करेल, जिथे उद्योगक्षेत्रातील सर्वात व्यापक AI सुसज्ज, फोटो-रिअल CGI क्रिएटर विकसित केले जात आहे, ज्यामध्ये DNEG ने अलीकडेच युनिटीकडून ज्याचा विशेष परवाना मिळविला आहे त्या ZIVA चाही समावेश आहे. ब्रह्मामुळे अॅप्लिकेशन्सच्या विस्तृत श्रेणीमधून फोटो-रिअल कन्टेन्ट निर्मितीचे लोकशाहीकरण होईल आणि असाधारण दर्जाच्या उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी या उद्योगक्षेत्रात अग्रस्थानी राहण्यातून मिळविलेल्या २५ वर्षांच्या अनुभवाच्या पायावर ही इमारत उभी केली जाईल.
  • DNEG समूहाची बौद्धिक संपदा (IP) आणि कन्टेन्ट निर्मिती शाखा प्राइम फोकस स्टुडिओजला त्यांची अलीकडची यशस्वी सहनिर्मिती द गारफील्ड मूव्हीच्या पाठोपाठ उच्च दर्जाच्या कन्टेन्टेमधील गुंतवणुकीचा आणि अशा कन्टेन्टच्या निर्मितीचा विस्तार करणे शक्य होईल.
  • DNEG समूह आपले नवे कार्यालय आणि व्हिज्युअल एक्स्पीरियन्स केंद्र अबु धाबी येथे उघडेल, व त्यानंतर कन्टेन्ट निर्मिती, साठवणूक आणि वितरणासाठी मध्य पूर्वेमध्ये एक जागतिक दर्जाची परिसंस्था विकसित करण्याची कंपनीची योजना असेल. यामुळे मीडिया आणि तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये उच्च कौशल्याची आवश्यकता असलेल्या नोकऱ्यांच्या निर्मितीला पाठबळ मिळेल व त्यातून सर्जनशीलतेचे शक्तिस्थान म्हणून या प्रांताचे स्थान अधिकच बळकट होईल.
  • DNEG चे चेअरमन आणि सीईओ नमित मल्होत्रा आपल्या विद्यमान पदावर कायम राहतील व समूहाच्या संचालक मंडळावर UASG मधील नबिल कोबेईसी आणि एदुआर्द झर्ड तसेच DNEG समूहाची एक प्रमुख गुंतवणूकदार कंपनी असलेल्या NaMa कॅपिटलचे प्रभू नरसिंहन त्यांची साथ देतील जे ब्रह्माचे एक्झेक्युटिव्ह चेअरमन बनतील ब्रह्माचा शुभारंभ आणि विस्तार यावर देखरेख ठेवण्यासाठी प्रभू नरसिंहन NaMa कॅपिटलमधून गैरहजेरीची रजा घेतील.

(हेही वाचा – T20 World Cup, India Champion : आधी तो हताश होऊन बसला, इतक्यात त्याने सूर्याला चमत्कार करताना पाहिलं)

DNEG समूहातील घटक :
  • DNEG हॉलिवूडच्या आणि जगभरातील व्हिज्युअल एंटरटेनमेन्ट क्रिएटर्सना Academy Award® विजेते व्हिज्युअल इफेक्ट्स, अॅनिमेशन आणि संबंधित सर्जनात्मक सेवा देत राहील. DNEG आपले काम तसेच ड्यून, ओपनहायमर, इंटरस्टेलर, टेनेट आणि ब्लेड रनर २०४९, तसेच हॅरी पॉटर, जेम्स बॉण्ड, फास्ट अँड फ्युरियस, मिशन:इम्पॉसिबल आणि मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स फ्रेंचाइजीससारख्या अनेक उच्चतम दर्जाच्या चित्रपट व अॅनिमेशनपटांतील कामगिरीसाठी ओळखले जाते.
  • संपूर्णपणे सक्रिय करण्यात येणारे ब्रह्मा उद्योगक्षेत्रातील अव्वल दर्जाच्या AI- सुसज्ज, फोटो-रियल CGI क्रिएटरचा पुरवठा करेल.
  • प्राइम फोकस स्टुडिओज लाइव्ह-अॅक्शन, अॅनिमेशन आणि गेमिंगसारख्या विविध स्तरांवर आपल्या कन्टेन्टमध्ये आणि IP गुंतवणूक व विकासामध्ये वाढ करेल. प्राइम फोकस हे सध्या अॅनिमल फ्रेंड्स, भारतीय महाकाव्य रामायण आणि अँग्री बर्ड्स मूव्ही ३ यांसारख्या अत्यंत नावाजलेल्या फीचर फिल्म्सची सह-निर्मिती करत आहे.
  • प्राइम फोकस टेक्नोलॉजीज ही क्लाउड आधारित सॉफ्टवेअर व आर्टिफिशिय इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानात आघाडीवर आहे, ज्यात CLEAR® AI कन्टेन्ट निर्मिती, कन्टेन्ट व्यवस्थापन आणि कन्टेन्ट मार्केटिंग व वितरण संचाचा समावेश आहे.

अबु धाबी डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचे चेअरमन हिज एक्सलन्सी अहमद जासिम अल झाबी म्हणाले, “युनायटेड अल साकेर समूहाने DNEG समूहामध्ये केलेली धोरणात्मक गुंतवणूक म्हणजे सर्जनशीलता, नवसंकल्पना, तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये वैश्विक ताकद म्हणून अबु धाबीच्या उदयाचे द्योतक आहे. ही भागीदारी केवळ मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील तांत्रिक प्रगतीला गती देणारी नसून त्यातून कन्टेन्ट निर्मितीसाठी एका भरभक्कम परिसंस्थेची जोपासना करण्याप्रती आमची बांधिलकीही अधोरेखित होत आहे. अबु धाबीमध्ये एक नवीन व्हिज्युअल एक्स्पीरियन्स हब स्थापन करून आम्ही रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण करत आहोत व उच्च तंत्रज्ञानाने सुसज्ज उद्योगक्षेत्र आणि सर्वोत्कृष्ट निर्मितीला पाठबळ पुरविणाऱ्या आमच्या परिसंस्थेमध्येही त्यामुळे सुधारणा घडून येत आहे. आम्ही उचललेल्या या पावलामुळे नव्या क्षेत्रांतील गुंतवणुकी, दूरदर्शी उद्यमशीलता आणि जिथे सर्जनशीलता व तंत्रज्ञान यांचा संगम होतो अशा भरभराटीस पूरक वातावरणासाठीचे प्रमुख गंतव्यस्थान म्हणून अबु धाबीची प्रतिष्ठा पुन:स्थापित झाली आहे.” (DNEG)

UASG चे सीईओ नबिल कोबेईसी म्हणाले, “नमित, प्रभू आणि DNEG समूहाशी हातमिळविणी करताना आम्ही अत्यंत भारावलेले आहोत. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मीडिया आणि मनोरंजन उद्योगक्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणण्याची नमित यांची दूरदर्शिता अतुलनीय आहे. या धोरणात्मक भागीदारीमुळे समूहाचे नवी वाट निर्माण करणारे AI सुसज्ज GGI क्रिएटर ब्रह्मा विकसित करण्याच्या प्रक्रियेला उत्तम गती मिळणारच आहे, पण त्याचबरोबर नमित यांच्या नेतृत्वाखाली यातून कन्टेन्ट निर्मिती आणि वितरणासाठीचे अवघ्या जगाचा केंद्रबिंदू म्हणून अबु धाबीचे स्थान प्रस्थापित होणार आहे. प्रगत AI तंत्रज्ञानांवर हुकुमत मिळवित आणि प्राइम फोकस स्टुडिओचा विस्तार करत आम्ही नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी व संपूर्ण UAE मध्ये लक्षणीय प्रमाणात नोकरीच्या संधी निर्माण करण्यासाठी सज्ज आहोत.” (DNEG)

DNEG चे चेअरमन आणि सीईओ नमित मल्होत्रा म्हणाले, “माझी संपूर्ण कारकिर्द तंत्रज्ञानासह व्हिज्युअल क्रिएटिव्हिटीमध्ये गुंतवणूक करण्यातून व या क्षेत्राचे नेतृत्व करण्यातून आकाराला आली आहे. UASG बरोबरची आमची भागीदारी, ब्रह्माचे बाजारपेठेतील पदार्पण आणि आमच्या कन्टेन्ट निर्मिती मंचाला मिळालेले यश या सगळ्यालाच आमच्या तंत्रज्ञानाच्या ताकदीचे इंधन मिळाले आहे. जगभरात सर्वोत्तम सेवा पुरविण्याच्या बाबतीत नेतृत्वस्थानी असलेली कंपनी म्हणून आम्ही आमच्या बिझनेस मॉडेलची नवी व्याख्या बनवित आहोत, नवीनतम तंत्रज्ञान आणि निर्मिती क्षमतांचा वापर करून गोष्टी सांगण्याच्या कलेचा दर्जा उंचावत आहोत.” (DNEG)

“या गुंतवणूकीमुळे DNEG समूहाच्या विद्यमान उपक्रमांना अधिक वेग मिळवून देईल आणि आम्ही पुरवित असलेल्या सेवा व आम्ही जिथे कार्यरत आहोत ती बाजारपेठ अशा दोन्ही संदर्भात आमच्या सेवांचा विस्तार करण्यास ग्रुपला अधिक सक्षम बनवेल. अबु धाबीमध्ये एक स्टुडिओ सुरू करून, कन्टेन्ट निर्मिती आणि तांत्रिक क्षमता या प्रांतामध्ये घेऊन येत आम्ही आमच्या यशाची उभारणी करत आहोत व तिथे स्वत:ला अग्रस्थानी प्रस्थापित करत आहोत ज्यामुळे आम्हाला जागतिक क्षमतांचा कधी नव्हे इतका लाभ घेणे शक्य होणार आहे.” (DNEG)

ब्रह्माचे एक्झेक्युटिव्ह चेअरमन प्रभू नरसिंहन म्हणाले, “ब्रह्मा या आम्ही विकसित करत असलेल्या सर्वात व्यापक, AI- सुसज्ज फोटो रिअल CGI क्रिएटरच्य साथीने प्रत्येक कथाकाराला आपल्या कल्पना वेगाने, स्वस्त दरांत आणि अधिक चांगल्या प्रकारे पडद्यावर उतरवण्यासाठी सुसज्ज बनविणे हे आमचे लक्ष्य आहे. येत्या महिन्यामध्ये आम्ही ब्रह्माच्या नेतृत्वदलाचा अधिक विस्तार करून, तंत्रज्ञान आणि AI क्षेत्रातील सर्वोत्तम प्रतिभेची व्हिज्युअल इफेक्ट्स क्रिएटिव्ह्जशी सांगड घालू व ज्यांच्याकडे सांगण्यासाठी एक गोष्ट आहे अशा प्रत्येकाला ब्रह्मा उपलब्ध करून देऊ.” (DNEG)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.