-
ऋजुता लुकतुके
हीरो कंपनीने गुजरातमध्ये सुरू असलेल्या ऑटो एक्स्पोमध्ये आपली नवीन स्कूटर हीरो डेस्टिनी १२५ लाँच केली आहे. गेल्यावर्षीच कंपनीने या स्कूटरची झलक लोकांना दाखवली होती. आता ती रस्त्यांवर धावताना दिसणार आहे. व्हीएक्स, झेडएक्स आणि झेडएक्सप्लस असा तीन प्रकारांत ही स्कूटर उपलब्ध होणार आहे. तर किंमत ८०,४५० रुपयांपासून सुरू होईल. (2024 Hero Destini 125)
या श्रेणीतील स्कूटरच्या तुलनेत डेस्टिनी स्कूटरचे फिचर वेगळे आणि या श्रेणीत पहिल्यांदा दिलेले आहेत. गाडी सुरू होण्यासाठी दिलेलं बटन वेगळं आहे. तर यात ऑटो – कॅन्सल विंकर बसवलेले आहेत. शिवाय गाडीची सीट मोठी, लेग रुम जास्त आणि फ्लोअरही मोठा आहे. एका लीटर पेट्रोलमध्ये ही गाडी ५९ किमींची सरासरी देऊ शकेल, असा कंपनीचा दावा आहे. (2024 Hero Destini 125)
Vinfast has showcased 6 electric scooters at Auto Expo: Eva 200, Klara S, Theon S, Feliz S, Vento S and VF DrgnFly! Click here to know more: https://t.co/FkOEdOZdx3#AutoExpo2025
— ZigWheels (@Zigwheels) January 18, 2025
नावाप्रमाणेच स्कूटरचं इंजिन एक सिलिंडर असलेलं १२४ सीसी इंजिन आहे. ९ बीएचपी इतकी ताकद यामुळे निर्माण होऊ शकते. या स्कूटरचे ब्रेक या श्रेणीतील सर्वोत्तम असल्याचा कंपनीचा दावा आहे. तसंच गाडी बंद असताना आपोआप गाडीचं इंजिन बंद होतं. आणि वेग वाढवल्यावर ते सुरूही होतं. या फिचरमुळे गाडीची सरासरीही वाढते. गाडीची सीट मोठी असल्यामुळे त्या खाली असलेलं स्टोरेजही वाढणार आहे. आता १९ लीटर इतकं स्टोरेज तुम्हाला मिळणार आहे. (2024 Hero Destini 125)
(हेही वाचा- Ranvir Shorey Net Worth : बिग बॉस ओटीटीचा सगळ्यात श्रीमंत स्पर्धक, विजेत्यापेक्षाही कमावले जास्त पैसे)
गाडीचा कन्सोल डिजिटल असेल. तर झेडएक्स आणि झेडएक्स प्लस या गाड्यांना ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीही असेल. झेडएक्स प्लस स्कूटरची किंमत ९० हजार रुपये इतकी आहे. या स्कूटरला टीव्हीएस ज्युपिटर, होंडा ॲक्टिव्हा आणि सुझुकी ॲक्सेस या कंपन्यांकडून स्पर्धा असेल. (2024 Hero Destini 125)