देशी दारू प्यायले अन् २४ हत्ती झोपले; ओडिशामध्ये घडला अजब प्रकार

ओडिशामध्ये अजब प्रकार घडला आहे, केओंझार जिल्ह्यात देशी दारू पिऊन तब्बल २४ हत्ती गाढ झोपी गेले. या गाढ झोपलेल्या हत्तींना उठवण्यासाठी गावकऱ्यांनी अनेक प्रयत्न केले, पण हत्ती काही उठले नाही… अखेर ढोल-ताशा वाजवल्यावर हत्ती उठले.

( हेही वाचा : टी-२० विश्वचषकातून भारत स्पर्धेबाहेर; रोहित शर्माच्या एका चुकीमुळे गेमचेंज, ट्वीटरवरही रंगली चर्चा )

देशी दारू पिऊन २४ हत्तींना गाढ झोप…

ओडिशामध्ये महुआ झाडाच्या फुलांपासून वाईन आणि देशी दारू सुद्धा बनवली जाते. केओंझारमधल्या गावातील लोकांनी जंगल क्षेत्रात महुआची फुले मोठ्या कुंड्यांमध्ये देशी दारू बनवण्यासाठी भिजवून ठेवली होती. यावेळी तेथे हत्तींचे आगमन झाले आणि दारूच्या नशेत हे हत्ती जंगलात झोपले. गावकरी या परिसरात सकाळी पोहोचले तेव्हा त्यांना तब्बल २४ हत्ती झोपलेले दिसले आणि आजूबाजूला सर्व भांडी तुटलेली होती, महुआच्या फुलांचे पाणी गायब होते. त्यावेळी हत्ती हे नशेचे पाणी पिऊन झोपले असल्याचा अंदाज गावकऱ्यांना आला.

ग्रामस्थांनी या हत्तींना उठवण्याचा प्रयत्न केला मात्र हे हत्ती काही केल्या उठत नव्हते, शेवटी ढोल-ताशा वाजवण्यात आल्यावर हे २४ हत्ती जागे झाले. यानंतर संबंधित घटनेची वनविभागाला माहिती देण्यात आली. गावकऱ्यांनी साठवलेले महुआचे पाणी पिऊनच हे हत्ती पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत गेल्याचा संशय वनाधिकाऱ्यांना आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here