279 IPC : काय आहे आयपीसी कलम २७९? या कलमाचा कोणत्या गुन्ह्यासाठी वापर केला जातो?

741
279 IPC : काय आहे आयपीसी कलम २७९? या कलमाचा कोणत्या गुन्ह्यासाठी वापर केला जातो?

वाचकहो, पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरण खूप गाजलं. बड्या बापाच्या बेट्याने दारु पिऊन भरधाव गाडी चालवून दोन तरुणांचा जीव घेतला. आयपीसीचे कलम २७९ सार्वजनिक रस्त्यावर वेगात आणि निष्काळजीपणे वाहन चालवण्याच्या गुन्ह्याशी संबंधित आहे. (279 IPC)

आयपीसी कलम २७९ म्हणजे काय?

जी व्यक्ती बेदरकारपणे किंवा बेजबाबदारपणे वाहन चालवून मानवी जीवन धोक्यात आणत असेल किंवा इतरांना इजा किंवा नुकसान पोहोचवत असेल तर या कलमाखाली त्या व्यक्तीला शिक्षा होते. हा गुन्हा दखलपात्र आहे, याचा अर्थ पोलीस वॉरंटशिवाय आरोपीला अटक करू शकतात. हा जामीनपात्र गुन्हा आहे, याचा अर्थ आरोपी जामिनावर सुटू शकतो. (279 IPC)

आयपीसी कलम २७९ चा उपयोग केव्हा केला जातो?

जेव्हा एखादी व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी खूप वेगाने गाडी चालवत असते. वाहन चालवताना त्या व्यक्तीचे लक्ष दुसरीकडे असल्यामुळे वाहनाद्वारे एखाद्याला दुखापत होते. गाडी चालवताना फोनवर कोणाशी तरी बोलत असल्यामुळे अपघात घडतो. तसेच कोणत्याही कारणामुळे तुम्ही चालवत असलेल्या वाहनामुळे एखाद्या व्यक्तीला इजा होते, अशा प्रकरणांत कलम २७९ अंतर्गत तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते. (279 IPC)

(हेही वाचा – City Civil Court Mumbai : जाणून घ्या मुंबईतील सिटी सिव्हिल कोर्टाचा इतिहास!)

आयपीसी कलम २७९ अंतर्गत शिक्षा

आयपीसीच्या कलम २७९ अंतर्गत गुन्ह्यासाठी सहा महिन्यांपर्यंत कारावास होऊ शकतो व रु. १००० पर्यंतचा दंड होऊ शकतो किंवा दोन्ही शिक्षेचा समावेश असू शकतो. (279 IPC)

तुरुंगवासाचा कालावधी आणि दंडाची रक्कम प्रकरणाची परिस्थिती आणि गुन्ह्याच्या गंभीरतेनुसार बदलू शकते. गुन्ह्याचे विशिष्ट परिणाम आणि संभाव्य परिणाम समजून घेण्यासाठी कायदेशीर व्यावसायिकाचा सल्ला घेणे अधिक श्रेयस्कर ठरेल. (279 IPC)

आयपीसी कलम २७९ पासून स्वतःचं रक्षण करा

कोणत्याही कारणास्तव घाईगडबडीत जावं लागतं म्हणून आपण वेगात गाडी चालवतो किंवा दारुच्या किंवा अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली येऊन गाडी चालवल्यामुळे त्रयस्त व्यक्तीचे नुकसान होते. अशा परिस्थितीत तुमच्यावर आयपीसी २७९ अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. म्हणून गाडी चालवताना काळजी घ्या. (279 IPC)

नशा किंचा चिंता सतावत असेल तर गाडी चालवू नका. गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नका. तरीही असा प्रकार घडला तर पळून जाण्याऐवजी जखमी व्यक्तीला मदत करा. लगेच तुमच्या वकीलांशी संपर्क साधून त्याला घडलेल्या घटनांचे तपशील द्या. तुमचा वकील तुम्हाला या प्रकरणांतून सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. मात्र चूक तुमची असता कामा नये व जीवितहानी होता कामा नये. (279 IPC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.