पाठीत पोक येतेय ? ३० सेकंदात ओळखा

चुकीच्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये तिशी आधीच पोक येत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. पाठ आणि मानेचे दुखणे असह्य झाल्यानंतर तरुण डॉक्टरांकडे येतात, असेही निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. पाठीवरचा ताण असह्य होत असेल तर तुम्हाला पोक येण्याचीही भीती असते. वेळीच याबाबतचे निदान होण्यासाठी केवळ ३० सेकंद शरीर पाठीच्याबाजूने भिंतीला चिकटवून ठेवा. शरीर वाकडे झुकत असल्यास किंवा पाठीकडून भिंतीच्या बाजूने फार काळ ताळ उभे राहता न आल्यास तुम्हाला पोक आल्याचे निदान होते.

पाठीला पोक येणे टाळायचे असेल तर रोजच्या जीवनशैलीत मूलभूत बदल केल्यासही शरीराची रचना पूर्ववत होण्यास मदत होईल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

( हेही वाचा: नवजात बालकाला मातांनी स्तनपान करण्याची पद्धत जाणून घ्या )

बैठ्या जीवशैलीतील बदल

खुर्चीवर बसून टेबलासमोरील संगणकावर काम करताना सतत मान वाकडी ठेवू नका किंवा मान खाली ठेवून काम करु नका. संगणकाची स्क्रीन डोळ्याला समांतर दिसायला हवी अशी टेबलाची रचना हवी. संगणकाखाली जड पुस्तके ठेवूनही डोळ्यांसमोर संगणकाची स्क्रीन समार दिसून येईल, अशी टेबलावर पुस्तकांची मांडणी करा.

ड्रायव्हिंग करताना घ्यावयाची काळजी

 ड्रायव्हिंगचे आसन आणि स्टेअरिंगमुळेही पाठीवर सतत ताण येत असतो. आसनावर पाठीच्या भागांवर नरम उशी ठेवल्यास पाठीला आराम मिळतो. चालकही व्यवस्थित ड्रायव्हिंगवर लक्ष केंद्रीत करु शकतो.

 वजनदार सामान उचलताना

जमिनीवरील वजनदार सामान उचलताना सामानाला जमिनीकडील भागांतून एका हाताने उचला. उठण्यापूर्वी सामान शरीराजवळ घेत दुसरा हात जमिनीवर ठेवून अलगद उचलण्याचा प्रयत्न करा. शक्यतो वजनदार सामान एक किंवा दोन किलोपेक्षा जास्त नसावे. त्यापेक्षाही जास्त सामान असल्यास घरातील इतर सदस्यांची मदत घ्या.

 मोबाईल पाहताना

मोबाईलची स्क्रिन पाहताना पाठीत बाक येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. चालताना किंवा बैठ्या जीवनशैलीतही डोळ्यांला समांतर मोबाईलची स्क्रीन असावी.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here