मुंबईला आणखी टेन्शन! ‘या’ दोन आजारांनी काढलं डोकं वर

हिवाळ्यातही मुंबईत मलेरिया, गॅस्ट्रोचे रुग्ण

मुंबईत थंडीचा मोसम सुरु असताना मलेरियाचे ४३ तर गॅस्ट्रोचे ९६ नवे रुग्ण आढळल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या नऊ दिवसांत ही नोंद झाली. पावसाळी आजार मुंबईत अद्यापही दिसून येत असल्याने आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

(हेही वाचा –कोरोनामुळे ‘या’ सांस्कृतिक शहरातील पर्यटनाला ‘ब्रेक’!)

यंदाच्या नव्या वर्षाच्या पहिल्या पाहणीत लेप्टो, डेंग्यू आणि चिकनगुनिया तसेच स्वाईन फ्लूसारखे आजार नियंत्रणात असल्याचे पाहायला मिळाले. शनिवारी पश्चिम उपनगरांत पावसाने हजेरी लावल्यने मुंबई महानगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे.त्यामुळे पावसाळी आजार पुन्हा डोके वर काढतील, अशी भीती पालिका आरोग्य विभागाला आहे.
गेल्या ९ दिवसांतील आकडेवारी

  • मलेरिया – ४३
  • लेप्टो – १
  • डेंग्यू – ०
  • गॅस्ट्रो – ९६
  • कावीळ – ७
  • चिकनगुनीया – ०
  • स्वाईन फ्ल्यू – ०

वर्षभरातील मुंबईत आढळून आलेल्या आजारांचा तपशील 

गेल्या वर्षी मलेरियाचे ५,१९३ रुग्णांची नोंद झाली,.लेप्टोचे २२४ रुग्ण आढळले. डेंग्यूचे ८७६, गॅस्ट्रोचे ३,११०, हेपेटायटिसचे ३०८, चिकनगुनियाचे ८० आणि एच १ एन १ चे ६४ रुग्ण सापडले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here