गोवा हे भारताच्या कोकण किनार्यावर वसलेलं एक राज्य आहे. गोव्याच्या उत्तरेला महाराष्ट्र, पूर्वेला कर्नाटक ही राज्य तर पश्चिमेला अथांग अरबी समुद्र आहे. गोवा हे क्षेत्रफळाच्या बाबतीत भारतातलं सर्वांत लहान राज्य आणि लोकसंख्येच्या बाबतीत चौथं सर्वात लहान राज्य आहे.
पणजी ही राज्याची राजधानी आहे. वास्को-द-गामा हे तिथलं सर्वांत मोठं शहर आहे. गोव्यातलं “मडगाव” हे एक ऐतिहासिक शहर आहे. या शहरामध्ये आजसुद्धा पोर्तुगीजांचा सांस्कृतिक प्रभाव दिसून येतो. १६ व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीज व्यापारी म्हणून गोव्यात आले होते. त्यानंतर लवकरच त्यांनी तिथे आपलं साम्राज्य स्थापन केलं. त्यानंतर गोवा हे पोर्तुगीज भारत म्हणून ओळखलं जायला लागलं. त्यानंतर गोवा मुक्ती संग्राम झाला आणि गोवा हे राज्य भारतात विलीन करण्यात आलं. गोव्यात बहुतेक ठिकाणी कोंकणी भाषा बोलली जाते. (5 star hotels in goa)
(हेही वाचा – Tamil Nadu मध्ये पुन्हा हिंदीद्वेष; मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा हिंदीला विरोध; केंद्र सरकारच्या विरोधात भाषिक युद्धाचा इशारा)
गोव्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक पर्यटक भेट देतात. त्याचं कारण म्हणजे इथले पांढऱ्या वाळूचे समुद्रकिनारे, इथली नाईटलाईफ, मंदिरं आणि जागतिक वारसा यादीमध्ये सूचीबद्ध असलेली इथली वास्तुकला होय. जगभारतातल्या दुर्मिळ अशा जैवविविधतेच्या आकर्षण केंद्रांपैकी एक असलेला जंगलाचा परिसर इथे आहे. इथल्या जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात वनस्पती आणि प्राणी देखील आढळून येतात.
पर्यटन
गोव्यामधलं पर्यटन हे मुख्यतः गोव्याच्या किनारी भागांवर केंद्रित आहे. २०१३ सालापर्यंत गोवा हे भारतीय आणि परदेशी पर्यटकांसाठी विशेषतः ब्रिटन आणि रशियन पर्यटकांसाठी पसंतीचं ठिकाण होतं. पण हल्ली इतरही अनेक पर्याय निर्माण झाले आहेत. (5 star hotels in goa)
गोव्याचे समुद्रकिनारे
गोव्याचे बहुतांश सौंदर्य हे त्यांच्या समुद्रकिनाऱ्यांवर अवलंबून आहे. सुमारे १०३ किलोमीटर म्हणजेच ६४ मैल एवढ्या लांबीच्या किनारपट्टीवर अरबी समुद्राचे काही अतिशय आकर्षक असे समुद्रकिनारे आहेत. गोव्याचे समुद्रकिनारे हे जगातल्या सर्वांत सुंदर समुद्रकिनाऱ्यांमध्ये गणले जातात. त्यांमध्ये अंजुना बीच, बागा बीच, बांबोलिम बीच, बेतुल बीच, कलंगुट बीच, कॅंडोलिम बीच, कॅव्हेलोसिम बीच, कोल्वा बीच, बेनौलिम बीच बटरफ्लाय बीच, मजोर्दा बीच आणि मिरामार बीच यांचा समावेश आहे.
जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत गोव्याला फिरायला येण्याचा विचार करत असाल, तर इथे राहण्यासाठी काही 5 स्टार हॉटेल्स आहेत. काही हॉटेल्सना लागून प्रायव्हेट बीचसुद्धा आहे. अशा काही हॉटेल्सची नावं पुढे दिलेली आहेत. (5 star hotels in goa)
(हेही वाचा – “कोणतीही आई स्वतःच्या मुलाला मारहाण करणार नाही” ; Bombay High Court चे निरीक्षण)
- हॉटेल ग्रँड हयात, गोवा
- हॉटेल विवांता, गोवा
- क्लब महिंद्रा रिसॉर्ट
- हॉटेल प्लॅनेट हॉलिवूड बीच, गोवा
- हॉटेल हार्ड रॉक, गोवा
हेही पहा –
Join Our WhatsApp Community