सायकल चालवणे (Cycling) हे आरोग्यासाठी उत्तम असून हा एक एरोबिक व्यायाम आहे, ज्यामुळे शरीराला अनेक लाभ प्राप्त होतात. तुम्ही फक्त सायकलिंग करून स्वतःला फिट ठेऊ शकता असे अभ्यासात सांगण्यात आले आहे. सायकल चालविल्याने आपल्या शरीराची हालचाल होते आणि अनेक आजारांपासून दूर राहाता येते. मानसिक आणि शारीरिक दोन्ही लाभ सायकलिंगमुळे मिळतात. आपले वय आणि क्षमतेनुसार रोज तुम्ही सायकल चालवू शकता.
वजन कमी करण्यासाठी उत्तम उपाय
रोज सायकल चालविण्याने (Cycling) तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते.पोटाची चरबी वाढली आहे आणि तुम्हाला कमी करण्यासीठी इतर कोणत्याही व्यायामापेक्षा सायकलिंग करण्याचा व्यायाम हा उपयुक्त ठरू शकतो. हेल्थलाइनने दिलेल्या वृत्तानुसार, सायकल चालविण्याने आपल्या शरीरातील फॅट्सची पातळी कमी होते आणि यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. अनेक अभ्यासानुसार, नियमित सायकलिंग केल्याने मेटाबॉलिजम वाढते. यामध्ये मांसपेशी निर्माण होऊन अधिक कॅलरी बर्न होते.
जॉइंट्स होतील मजबूत
रोज सायकल चालविल्याने आपल्या पायांना मजबूती आणि बळकटी मिळते. सायकल चालविल्याने आपल्या शरीराचा खालचा भाग अधिक मजबूत होतो. यामध्ये तुमच्या जॉईंट्सवर दबाव पडत नाही आणि आपल्या पायांचे स्नायू अधिक बळकट होतात. पायांची अधिक बळकटी हवी असल्यास, सायकलिंगसह तुम्ही वेट लिफ्टिंगसारखे व्यायामही करू शकता.
(हेही वाचा Hate Speech : नुपूर शर्मांवर कारवाई आणि उदयनिधी, टी राजांना अभय; का होतोय भेदभाव?)
कोलेस्ट्रॉल होते झर्रकन कमी
सध्या कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या अधिक दिसून येते. तुम्हाला सायकल चालविण्यामुळे (Cycling) कोलेस्ट्रॉलचा स्तर सुधारण्यास मदत मिळू शकते. सायकल चालवल्यामुळे आपल्याला हृदयाचा स्ट्रोक आणि हृदयाचा झटका येण्याचा त्रासही कमी होऊ शकता. एका अभ्यासात सांगण्यात आल्यानुसार, इनडोअर सायकलिंगमुळे कोलेस्ट्रॉलवर सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.
ब्रेन पॉवर वाढविण्यासाठी
सायकल चालवल्यामुळे तणाव, चिंता आणि नैराश्यासारख्या भावना कमी होतात. सायकल चालवताना रस्त्यावर लक्ष केंद्रित केल्याने एकाग्रता आणि जागरूकतेचा विकास होतो. एका अभ्यासात सांगण्यात आल्यानुसार, सायकल चालविल्याने वृद्ध व्यक्तींच्या मानसिक आरोग्यामध्येही सुधारणा होते. तुम्हाला आळस वाटत असेल तर कमीत कमी १० मिनिट्स सायकल रोज चालवावी. यामुळे शरीरातील एंडोर्फिन हार्मोन वाढते आणि तणाव कमी होऊन ब्रेन पॉवर वाढण्यास मदत मिळते.
आजारांपासून राहाल दूर
सायकल चालवल्याने (Cycling) अनेक आजार तुम्ही दूर ठेऊ शकता. रोज सायकल चालविल्याने हृदयासंबंधित आजार अर्थात स्ट्रोक, हृदयविकार आणि हाय ब्लड प्रेशर हे दूर राहाते. तसंच टाइप २ डायबिटीस नियंत्रणात आणण्यासही मदत मिळते. नियमित स्वरूपात सायकल चालविल्याने शुगर असणाऱ्या व्यक्तींचा मृत्यू दर २४% कमी होऊ शकतो असे अभ्यासात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community