78व्या वर्षी तीन हजार वर्ष जुनी कला जीवंत ठेवणा-या ‘अम्मा’! कोणती आहे ही कला

त्यांच्यामुळेच भारतात या कलेला ओळख मिळाली.

केरळ राज्यातील कोझीकोड जिल्ह्यातील वटाकारा येथील मीनाक्षी अम्मा या भारतातील सर्वात जुन्या मार्शल आर्टपटू मानल्या जातात.केरळमध्ये पारंपारिक मार्शल आर्ट कलारीपयट्टूच्या प्रॅक्टिश्नर आणि शिक्षिका मीनाक्षी अम्मा 78 वर्षांच्या असून, त्या भारतातील सर्वात जुन्या मार्शल आर्टपटू आहेत. तीन हजार वर्ष जुन्या असलेल्या या कलेला आजही जीवंत ठेवण्याचं काम त्या करत आहेत.

स्वसंरक्षणासाठी शिकावी ही कला

केरळ, दक्षिण भारतातील या आजी कलारीपयट्टू या कलेला जीवंत ठेवण्यासाठी धडपडत आहेत. आपल्याकडे असलेली ही प्राचीन कला आताच्या पिढीने आत्मसात करावी, आणि मुलींनी त्यातून प्रेरणा घ्यावी हा त्यांचा उद्देश आहे. यातून मुलींनी प्रोत्साहित होऊन, आपल्या आत्मरक्षणासाठी या कलेला आत्मसात करण्याच त्या आवाहन करतात.

मुलींना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बळकट करणारी कला

जेव्हा मी सात वर्षांची होते तेव्हा कलाररीपयट्टू शिकायला सुरुवात केली होती. आता मी 78 वर्षांची आहे, अजूनही मी या कलेचा सराव करते आणि स्वत: शिकते आहे. 1949 रोजी माझ्या दिवंगत पतीने स्थापन केलेल्या कडथनाद कसारी संगम शाळेत मी कलारीपयट्टू ही कला अजूनही शिकवत आहे, असं मीनाक्षी अम्मा म्हणतात. आजकाल आपण कधीही वर्तमानपत्र उघडलं तर महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या वाचायला मिळतात. जर महिलांनी कलारीपयट्टू कलेला आत्मसात केलं तर त्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बळकट होतील. त्यांचा आत्मविश्वास वाढेल, त्यामुळे मुलींनी ही कला नक्की आत्मसात करावी.

अम्मांमुळे या कलेला मिळाली नवी ओळख

कलारी ज्यात नृत्य आणि योगाचे घटक आहेत. त्यात तलवार, ढाल आणि काठी यांसारख्या शस्त्रांचा समावेश करता येऊ शकतो. प्राचीन हिंदू धर्मग्रंथांमध्ये नमूद केल्याप्रमाणे ही कला तीन हजार वर्ष जुनी आहे. ब्रिटीशांनी 1804 मध्ये या कलेवर बंदी घातली, पण तेव्हाही ही कला भूमिगतरित्या चालूच राहिली आणि 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या कलेला पुनरुज्जीवन मिळाले.अलिकडच्या दशकात ही कला झेप घेत आहे, त्यासाठी 2017 मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या मीनाक्षी अम्मांचे आभार मानावे लागतील. कारण त्यांच्यामुळेच भारतात या कलेला ओळख मिळाली.

“ही एक अशी कला आहे जी मन, शरीर आणि आत्मा शुद्ध करते, एकाग्रता, गती आणि संयम सुधारते, शारीरिक आणि मानसिक ऊर्जा पुन्हा निर्माण करते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here