नकारात्मक विचार दूर करण्याचे ८ रामबाण उपाय

आज अनेक माणसं एका नकारात्मक सावटाखाली वावरत आहेत. बातम्या ते सोशल मीडिया सगळीकडे सतत नकारात्मक गोष्टी समोर दिसतात. नकारात्मकतेमुळे माणूस आपल्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण कारु लागलेला आहे. यामुळे आपली प्रगती खुंटते. आपण एका वेगळ्याच फेजमध्ये जातो. म्हणून या नकारात्मकतेतून बाहेर पडणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील.

( हेही वाचा : आदित्य ठाकरेंनी नेम साधत केले रायफल शूटिंग प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण)

१. जे जे चांगले आहे ते लिहित रहा

आपल्या आयुष्यात जे जे चांगले घडले आहे ते लिहित रहा. मग अगदी तुम्ही रिक्षासाठी वाट पाहताना कुणीतरी तुम्हाला लिफ्ट दिली तरी ती गोष्ट सकारात्मक आहे, असं समजून एका डायरीत लिहा. लिहिलेलं मनात जातं. म्हणून चांगल्या गोष्टी लिहिल्या की याचा मनावर परिणाम होतो आणि आपण सकारात्मक विश्वास वावरु लागतो.

२. नकारात्मक लोकांपासून दूर रहा

काही लोक असतात, जे सतत नकारात्मक बोलत राहतता. अशा लोकांच्या संगतीत राहिल्यामुळे आपल्या मनावर देखील याचा परिणाम होतो आणि आपण नकारात्मक होऊन जातो. म्हणून अशा लोकांपासून दूर राहण्यातंच शहाणपणा आहे. उलट सकारात्मक लोकांमध्ये वारत जा, जेणेकरुन सकारात्मक स्पंदन आकृष्ट होतील.

३. काहीतरी करा

नकारात्मक गोष्टीतून मन डायव्हर्ट करण्यासाठी तुम्हाला काहीतरी करणं खूप गरजेचं असतं. मग तुम्ही काहीही चांगलं करु शकता. चित्रपट बघायला जाऊ शकता. एखाद्या मित्रासोबत फोनवर मनसोक्त गप्पा मारु शकता. पुस्तकं वाचू शकता किंवा फिरायलाही जाऊ शकता.

४. योग करा

योग केल्याने तुमचं शरीर आणि मन सुद्धा सुदृढ राहतं. ३० मिनिटे रोज मेडिटेशन केल्याने तुम्हाला स्वतःबद्दल आणि जगाबद्दल पॉजिटिव्ह वाटू लागेल. तुमचा स्वभाव चिडचिडा होणार नाही.

५. मोबाईल फोटोग्राफी करा

आपण आता आधुनिक युगात जगत आहोत. त्यामुळे तोडगे सुद्धा आधुनिक असायला हवेत. खरं सांगायचं तर फोटो काढायला कुणाला नाही आवडत? आता तर सेल्फीचा जमाना आहे. तर एके दिवशी तुम्हाला आवडणार्‍या गोष्टींचे मोबाईलमधून फोटो काढा. जसं पक्षी, प्राणी, पाळीव प्राणी, झाडं, निसर्ग इ. यामुळे तुमचं मन रमेल.

६. पॉजिटिव्ह मेसेजेस तयार करा

सकारात्मकता जवळ ओढण्यासाठी सतत सकारात्मक वातावरणात राहावं लागेल आणि ते वातावरण तुम्हाला स्वतःच निर्माण करावं लागेल. मग यासाठी एक मार्ग म्हणजे तुम्ही सकारात्मक विचारांचे ऑनलाईन पोस्टर्स तयार करुन शेअर करु शकता. तुमच्यासोबत इतर लोकंही मोटिव्हेट होतील.

७. बोलते व्हा

जर तुमच्या मनात एखादी गोष्ट सलत असेल तर ती मनात साठवून ठेवण्याऐवजी बोलते व्हा. तुमच्या सर्वात जवळच्या व्यक्तीकडे व्यक्त व्हा. बोलल्याने मन हलकं होतं आणि साठवून ठेवल्याने जड होतं. म्हणून बिनधास्त व्यक्त व्हा आणि मनातली सगळी नकारात्मकता काढून टाका.

८. हसत रहा

हसायचं म्हणजे केवळ चेहरा हसरा ठेवायचा नाही, तर मनंही हसरं ठेवायचं आहे. म्हणजे ज्या ज्या वाईट गोष्टी असतील त्या स्वाः करुन टाका. वाईट गोष्टींचं भूतकाळातील वाईट आठवणींचं ओझं घेऊन जगू नका. आठवणींचं भूत आपल्या मानगुटीवरुन काढून टाका आणि सतत हसत रहा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here