आंध्र प्रदेशातील कुरनूलचा रहिवासी गंधम भुवन जय या आठ वर्षाच्या मुलाने 18 सप्टेंबर (शनिवार) रोजी युरोपमधील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रस सर केले आहे. एल्ब्रस हे युरोपमधील सर्वोच्च सात शिखरांपैकी एक आहे. त्यामुळे दक्षिण रशियामध्ये 5 हजार 642 मीटर उंच शिखरावर चढणारा गंधम भुवन जय आंध्र प्रदेशातील सर्वात तरुण मुलगा ठरला आहे.
शिखरावर चढल्यावर भुवन जयने प्रथम भारतीय तिरंगा फडकवला आणि नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाची प्रस्तावना असलेला फलक दाखवला.
(हेही वाचाः अमेरिकेतील चाहत्यांचे मोदींना ‘नमो-नमो’: झाले जंगी स्वागत)
याआधी याने केले शिखर सर
प्रशासकीय अधिकारी आणि अनंतपूरचे माजी जिल्हाधिकारी गंधम चंद्रदु यांचा मुलगा भुवन आणि मोहीम पथकातील इतर सदस्य भारतात परतण्याच्या मार्गावर आहेत. धर्मावरम मधील आणखी एक तरुण, मुक्केरा पुरुषोत्तम याने महिन्याभरापूर्वीच 15 ऑगस्ट रोजी हे शिखर सर केले होते.
तिसरीत इयत्तेत केला पराक्रम
माउंट एल्ब्रस चढताना गिर्यारोहकांना प्रतिकूल हवामान आणि अत्यंत शारीरिक ताणतणावाला सामोरे जावे लागते. अनंतपूर येथील ग्रामीण विकास ट्रस्टचे (आरडीटी) क्रीडा प्रशिक्षक शंकराय्या यांनी तिसरीत शिकणाऱ्या भुवनला गिर्यारोहणाचे प्रशिक्षण दिले होते. स्वत: एक पर्वतारोही असलेल्या शंकराय्या यांनी गेल्या वर्षी आफ्रिकेचे सर्वोच्च शिखर माउंट किलिमांजारो सर केले होते.
(हेही वाचाः चिपीवरुन काहीच दिवसांत उडणार विमान! किती आहे तिकीट?)
प्रोत्साहन दिल्याबद्दल भुवन जयने आपल्या पालकांचे आणि प्रशिक्षकांचे आभार मानले आहेत. संधी मिळाली तर आणखी अनेक मुले असा पराक्रम गाजवू शकतात, असं भुवन म्हणाला.
Join Our WhatsApp Community