दम्यावर मात करत तिने पार केला समुद्र! ९ वर्षीय चिमुकलीचा नवा विक्रम…

150

रेवा निखिल परब या ९ वर्षाच्या चिमुकलीच्या नावे नवा विक्रम नोंदवला गेला आहे. मूळची तारकर्लीची आणि सध्या नवी मुंबईत राहणारी ९ वर्षाची चिमुकली रेवा परब हीने २३ जानेवारीला अवघ्या २ तास ४४ मिनिटांत एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया हे अंतर पोहून पार केले. यामुळे या चिमुकलीवर चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे.

रेवाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, बेस्ट समिती अध्यक्ष नगरसेवक, शिवसेना विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तिने केलेला विक्रम हा तिच्या वयोगटातील सर्वात कमी वेळेत केलेला विक्रम आहे.

( हेही वाचा : तुम्ही WhatsApp ग्रृपचे अ‍ॅडमिन आहात का? वाचा तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी )

पाच वर्ष नियमित सराव 

नवी मुंबईतील सेंट फादर अग्नेल मल्टीपरपज स्कूलमध्ये रेवा ही इयत्ता चौथीत शिक्षण घेत आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून रेवाला दम्याचा त्रास होता. सतत पंप बाळगणे आवश्यक होते. म्हणून तिच्या पालकांनी तिला बालरोगतज्ज्ञांना दाखवले. डॉक्टरांनीच तिला स्विमिंग शिकवण्याचा सल्ला दिला. दम्याचा त्रास होत असताना ती पाण्याखाली श्वास कसा घेणार याची धास्ती तिच्या पालकांना होती परंतु यासाठी तिने खूप मेहनत घेतली आणि ५ वर्षांच्या अथक मेहनतीनंतर तिने एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडियाचा समुद्र अवघ्या २ तास ४४ मिनिटांत पोहून पार केला आहे.

मुलीच्या कामगिरीचा आनंद

मला या गोष्टीचा फार आनंद झाला आहे. याकरता माझ्या मुलीने खूप मेहनत घेतली होती. नियमित सरावामुळे ती दम्यामधून पूर्णपणे रिकव्हर झाली आहे. इतर पालकांनीही आपल्या मुलांना कायम सहकार्य केले पाहिजे. असे रेवाचे वडील निखिल परब यांनी सांगितले. तसेच भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभाग घेण्यासही रेवाला संपूर्ण प्रोत्साहन देणार असेही त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.