९ वर्षाच्या मुलाची फोर्ब्जच्या यादीत हॅट्रिक

दरवर्षी युट्यूबच्या माध्यमातून सर्वात जास्त कमाई करणाऱ्या टॉप-5 युट्युबर्सच्या नावांची फोर्ब्जकडून यादी जाहीर केली जाते. याच यादीत सलग तीन वर्ष अव्वल राहण्याचा विक्रम नऊ वर्षीय रियान काजी याने केला आहे. त्याने तब्बल २९ मिलियन डॉलर्सची म्हणजेच २१० कोटींची कमाई केली आहे. त्याच्या युट्युब चॅनलचं नाव ‘रियान्स वर्ल्ड’ आहे. त्याच्या चॅनल्सचे थोडेथोडके नाही तर जवळजवळ 3 कोटी सबस्क्राइबर्स आहेत. अवघ्या नऊ वर्षांचा रियान हा खेळण्यांचा रीव्ह्यूवर आहे. तो त्याच्या चॅनलवर मुलांच्या खेळण्यांचे रिव्हयू देतो.

(हेही वाचाः कोकणात जाणा-यांसाठी राणे सोडणार फुकट ट्रेन)

यश वय बघून येत नाही

त्याची विविध कार्टून चॅनल्स तसेच टॉय ब्रॅण्ड्ससोबत पार्टनरशिप आहे. तीस जणांची टीम त्याचं हे चॅनेल सांभाळते. रियान काजी आपल्या चॅनलवर मुलांच्या खेळण्याच्या वस्तूंचे अनबॉक्सिंग करतो व त्याचे व्हिडिओ बनवतो. सोशल मीडियावर त्याच्या या व्हिडिओना खूप पसंत केले जाते. अवघ्या ९ वर्षांत कोट्यावधी रुपयांची कमाई करुन रियानने अनेकांना तोंडात बोटे घालायला लावली आहेत. यशाला वयाची मर्यादा नसते हेच खरं.

हे आहेत टॉप ५ यूट्यूबर

  1. रियान काजी – २९.५ मिलियन डॉलर
  2. मिस्टर बीस्ट – २४ मिलियन डॉलर
  3. ड्यूड परफेक्ट – २३ मिलियन डॉलर
  4. रेट एन्ड लिंक – २० मिलियम डॉलर
  5. मार्कीप्यायर – १९.५ मिलियन डॉलर

(हेही वाचाः भावा-बहिणीच्या अतूट नात्यांचा सण रक्षाबंधन!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here