फुफ्फुसाच्या कर्करोगाचा जगभरात विळखा वाढतोय. भारतातही फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. भारतातील कर्करोगातील मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या पहिल्या पाच कर्करोगात फुफ्फुसाच्या कर्करोगाचा समावेश झाला आहे. फुफ्फुसाचा कर्करोगाने ग्रासलेले ९० टक्के रुग्ण शेवटच्या टप्प्यात निदानाकरिता येतात, असे निरीक्षण कर्करोग तज्ज्ञांनी केले आहे.
फुफ्फुसाचा कर्करोग धूम्रपान करण्यामुळे होतो हे खरे असले तरीही प्रदूषण आणि रसायनांमुळे धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग होत असल्याचे दिसून आले, अशी माहिती कर्करोगतज्ञांनी दिली. ताप आणि कफ असल्यास रुग्ण दुर्लक्ष करतात. कर्करोग होऊन तिसरा किंवा चौथा टप्पा गाठल्यानंतर रुग्ण निदानासाठी येतात आणि फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदान होते.
(हेही वाचा – LPG Gas Cylinder : महिन्याच्या पहिल्याच दिवशी आनंदवार्ता; व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती घसरल्या)
फुफ्फुसाचा कर्करोग हा सायलेंट किलर मानला जातो. सुरुवातीच्या काळात या कर्करोगाची लक्षणे क्वचितच आढळून येतात. धुराच्या संपर्कात आल्यास फुफ्फुसाचा कर्करोग होतो. त्यामुळे धूम्रपान करत नसाल तरीही रुग्णांना फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता दाट आहे. खोकताना रक्त येणे, धाप लागणे, हाडे दुखणे, वजन कमी होणे आदी लक्षणे रुग्णाच्या शरीरात सुरुवातीला पाहायला मिळतात. रेडिएशन आणि केमोथेअरपी फुफ्फुसाच्या कर्करोगावर उपचार म्हणून दिले जातात. दोन्ही फुफ्फुसांमध्ये कर्करोग झाला असेल तर मग धोका जास्त वाढतो अशी माहिती कर्करोग तज्ज्ञांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community