मांजर-कुत्रा यांसारख्या पाळीव प्राण्यांवर प्रेम करणाऱ्यांची संख्या आपल्या देशात कमी नाही. अनेक लोक अशा पाळीव प्राण्यांना घरातील एक सदस्य म्हणून जीव लावतात. अशाच उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील एक पाळीव मांजर आणि कुटुंबाच्या प्रेमाची सध्या चर्चा सुरू आहे.
( हेही वाचा : रविवारी रेल्वेच्या ‘या’ मार्गावर १२ तासांचा मेगाब्लॉक! )
१० हजाराचे बक्षीस
प्रयागराजमधील मोहम्मद ताहिर यांच्याकडे लुसी नावाची पाळीव मांजर होती. परंतु काही दिवसांपासून ही मांजर बेपत्ता झाली आहे. पाळीव मांजर हरवल्यानंतर त्यांचे कुटुंबीय नाराज झाले असून ताहिर यांच्या घरातील काही सदस्य रडत आहेत तर काहींनी जेवण बंद केले आहे. परिसरातील भिंतींवर लुसी हरवली असल्याचे पोस्टरही लावण्यात आले आहेत. यावरून या कुटुंबीयांचे लुसीवर किती प्रेम असेल याचा अंदाज आपण बांधू शकतो. एवढेच नाहीतर लुसीला शोधणाऱ्याला ताहिर कुटुंबीयांकडून १० हजाराचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
सर्व कुटुंबीय चिंतेत
दीड वर्षांपूर्वी आम्ही लुसीला घरी आणले होते. ती हरवल्यापासून आम्ही सर्व कुटुंबीय चिंतेत आहोत. तिला कोणी चोरले तर नाही ना? या शंकेने आम्ही तिला शोधून काढेल त्यास १० हजाराते बक्षीस जाहीर केले आहे अशी माहिती मोहम्मद ताहिर यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community