Shark Tank Indiaमध्ये दाखवण्यात आला खूपच स्वस्त लॅपटॉप! जाणून घ्या Primebook लॅपटॉपबद्दल

172

आज कोणताही ब्रॅंडेड लॅपटॉप घ्यायला जाल तर २५ ते ३० हजारापेक्षा कमी किंमतीत मिळणार नाही. तुम्हाला जर कुणी असं सांगितलं की १७,००० पेक्षा कमी किंमतीत तुम्हाला चांगला लॅपटॉप मिळू शकेल तर तुम्ही विश्वास ठेवाल का? Shark Tank India च्या दुसर्‍या सीजनमध्ये असे अनेक जबरदस्त उत्पादन दाखवण्यात येत आहे, जे पाहून भारतातील नाविन्यतेची जाणीव होते.

आयआयटी दिल्लीच्या अमन वर्मा आणि चित्रांशू महंत यांनी Primebook नावाचा एक लॅपटॉप तयार केला आहे. हा लॅपटॉप ऍंड्रॉइडवर आधारित असून विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. Primebook वजन फक्त १.२ किलो आहे, त्यामुळे प्रवासासाठी हा लॅपटॉप उत्तम असून डिव्हाइस ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज आहे तसेच प्राईम ओएस डिव्हाइसवर काम करतो.

(हेही वाचा मोदींना जवळून बघण्याच्या मोहापायी केले धाडस आणि घडले भलतेच)

मायक्रो एसडी कार्डद्वारे २०० जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येऊ शकतो. महत्वाची बाब म्हणजे ११.६ इंचाचा डिस्प्ले उपलब्ध आहे. तसेच यामध्ये २एमपी चा एचडी कॅमेरा आहे. यामध्ये MediaTek Kompanio 500 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. हा लॅपटॉप Shark Tank India या कार्यक्रमात दाखवण्यात आला असून त्यांनी ही वैशिष्ट्ये सांगितली आहेत.

या लॅपटॉपची किंमत केवळ १६,९९० रुपये असून तुम्ही ४९९ रुपये भरुन पूर्व नोंदणी करु शकता. पूर्व नोंदणी केल्यावर मार्च २०२३ पर्यंत घरपोच हा लॅपटॉप तुम्हाला मिळू शकेल. उत्पादकांसाठी आनंदाची बाब म्हणजे त्यांना पीयूष बंसल आणि अमन गुप्ता यांच्याकडून ३ टक्क्यांसाठी ७५ लाखांची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. या नव-उद्योजकांनी बनवलेला लॅपटॉप एकदा वापरुन बघायला हरकत नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.