आधार कार्ड (Aadhaar Card) पॅन कार्डला ( Pan Card) लिंक असणे हे बंधनकारक करण्यात आले आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेजकडून आधारला पॅन लिंक करण्यासाठी ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र सीबीडीटीद्वारे जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार आता तुम्ही आधार-पॅन लिंक केले नसेल तर तुम्हाला आता १ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. ३० जून २०२२ पर्यंत आधार – पॅन लिंक दंड ५०० रुपये होता मात्र १ जुलैपासून हा दंड १ हजार करण्यात आला आहे.
( हेही वाचा : विमानतळ प्रवाशांसाठी ‘बेस्ट’ सेवा! या मार्गावर सुरू होणार वातानुकूलित बस)
आधार – पॅन लिंक केले नाही तर काय होईल?
तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारला लिंक केले नाही तर तुमचे पॅन निष्क्रिय होऊ शकते. पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास तुम्हाला अनेक समस्या येऊ शकतात, कारण भारतात सर्वच आर्थिक व्यवहारांमध्ये पॅन कार्डची आवश्यकता असते. बॅंकेचे खाते ओपन करण्यासाठी, इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर आधारला पॅन लिंक करा असे आवाहन सीबीडीटीच्या वतीने करण्यात आले आहे.
आधार – पॅन लिंक करण्यासाठी काय कराल?
- लिंक करण्यासाठी www.incometax.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. त्यानंतर quick लिंक सेक्शनमध्ये आधार ऑप्शनवर जा. त्यावर क्लिक केल्यानंतर नवी विंडो ओपन होईल. तुम्ही तुमच्या पॅन, आधारसोबत नाव आणि मोबाईल नंबरची माहिती द्या.
- सर्व माहिती भरल्यावर I Validate My Aadhaar Details ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर registered mobile number वर OTP येईल, तो ओटीपी टाकून व्हॅलिडेटवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला दंड भरावा लागेल आणि आधार-पॅन लिंकची प्रक्रिया पूर्ण होईल.
दंड कसा भराल ?
- आधार – पॅन लिंक नसेल तर दंड भरण्यासाठी या पोर्टटला भेट द्या
- https://onlineservices.tin.egov-nsdl.com/etaxnew/tdsnontds.jsp
- पॅन-आधार लिंक रिक्वेस्टसाठी CHALLAN NO./280 वर क्लिक करा
- tax applicable निवडा
- यानंतर पेमेंटची पद्धत निवडा यामध्ये नेटबॅंकिंग किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट करण्याचा ऑप्शन असेल.
- पॅन क्रमांक समाविष्ट करा
- कॅप्चा टाका आणि proceed टॅबवर क्लिक करा.