Aadhar Card लाही असते Expiry Date; या स्टेप्स फाॅलो करत, करा Renew

161

आधार कार्डलाही एक्सपायरी डेट असते. आधार कार्डशिवाय जवळपास सर्वच शासकीय कामे खोळंबतात. थोडक्यात आधारकार्डशिवाय कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. ( Aadhar card Expiry) त्यामुळे आधार कार्ड एक्सपायर झालं असेल, तर काही टेन्शन नाही, या स्टेप्स फाॅलो करत तुम्ही तुमचे आधार कार्ड रिन्यू (Renew) करु शकता.

आधार कार्डला एक्सपायरी डेटदेखील असते. ही एक्सपायरी डेट आधार बनवणा-या UIDAI ने निश्चित केली आहे. UIDAI द्वारे बनवलेली अनेक प्रकारची आधार कार्ड्स आहेत, ज्यात नवजात मुलांसाठी ब्लू आधार कार्ड, 5 वर्षांपेक्षा कमी वयाचे आधार कार्ड, 5 ते 15 वर्षे वयोगटातील लोकांसाठी आधार कार्ड आणि प्रौढांसाठी आधार कार्ड यांचा समावेश आहे. आधार कार्ड वेळोवेळी अपडेट करणे आवश्यक आहे. जर आधार कार्ड वेळेवर अपडेट केले नाही, तर ते कालबाह्य होईल.

आधार कार्ड कधी कालबाह्य होऊ शकते?

लहान मुलांसाठी जर ब्लू कार्ड बनवले असेल तर ते 5 वर्षांनंतर कालबाह्य होईल. त्याचवेळी, 5 वर्षांवरील आणि 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी तयार केलेले आधार अपडेट न केल्यास ते अक्षम केले जाते. यामध्ये बायोमेट्रिक डेटा अपडेट करणे आवश्यक आहे. त्याचवेळी, प्रौढ लोकांसाठी, आधार कार्ड आयुष्यभर सारखेच राहते. तसेच, पत्ता, क्रमांक किंवा इतर कोणतीही महत्त्वाची माहिती बदलल्यास, आपण ती अपडेट करु शकता.

( हेही वाचा: गोव्यात शिक्षकांवर अनोखी सक्ती, आता संध्याकाळपर्यंत सुट्टीच नाही )

असे करा आधार कार्ड renew

  • जर तुम्हाला कालबाह्य झालेले आधार कार्ड रिन्यू करायचे असेल, तर तुम्हाला ते अपडेट करावे लागेल. UIDAI फक्त 5 वर्षे आणि 15 वर्षे वयामध्ये बायोमेट्रिक डेटा अपडेट करण्यास सांगते.
  • बायोमेट्रिक डेटा अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार केंद्राला भेट द्यावी लागेल.
  • येथे तुमचे बायोमेट्रिक तपशील- फिंगरप्रिंट आणि छायाचित्र अपडेट केले जातील.
  • यासोबतच नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, मोबाईल नंबर, ईमेल अपडेट नसेल तरीही तुम्ही अपडेट करु शकता
  • सर्व माहिती दिल्यानंतर, काही दिवसांत तुमचे आधार कार्ड रिन्यू केले जाईल, ते तुम्ही कुठेही वापरु शकाल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.