आता ऑफलाइनही होणार आधारकार्ड पडताळणी, वाचा नवे नियम

आधार कार्ड पडताळणी अर्थात व्हेरिफिकेशनसाठी नवा नियम लागू करण्यात आला आहे. आता आधारकार्डची पडताळणी ऑफलाइन सुद्धा करता येणार आहे. नविन नियमानुसार आता स्वाक्षरीला जास्त महत्त्व असणार आहे. आता व्हेरिफिकेशनसाठी डिजिटल स्वाक्षरी असलेले कागदपत्रे सादर करावे लागणार आहेत. डिजिटल स्वाक्षरी असलेले हे कागदपत्र आधार कार्ड संबंधीची सरकारी संस्था यूआयडीएआय द्वारे जारी केले जाणार आहेत.

पेपरलेस ऑफलाइन केवायसीचा पर्याय 

डिजिटल सही असलेल्या या कागदपत्रावर आधार क्रमांकाचे शेवटचे चार आकडे दिले जातील. या नव्या नियमावलीत, ई- केवायसी ऑफलाइन पडताळणीची सविस्तर प्रक्रियादेखील सांगण्यात आली आहे. आता ई- केवायसी पडताळणी प्रक्रियेसाठी कोणत्याही अधिकृत एजन्सीला पेपरलेस ऑफलाइन आधार केवायसी देण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या नियमानुसार ती एजन्सी आधार धारकाने दिलेला क्रमांक, नाव, पत्ता ही सगळी माहिती केंद्राच्या डेटाबेससोबत जुळवून बघेल आणि ही सगळी माहिती बरोबर असेल तरच व्हेरिफिकेशन प्रक्रिया पुढे चालू राहणार आहे.

असे  करा आधार पडताळणी 

ई-केवायसीसाठी पडताळणी करताना इतर पद्धती जसे की वन-टाइम पिन आणि बायोमेट्रिक-आधारित प्रमाणीकरण या पद्धतीही सुरु राहणार आहेत. आधार डेटाची पडताळणी करण्यासाठी अधिकृत एजन्सी कोणतीही योग्य पद्धत निवडू शकतात.

 (हेही वाचा : महाराष्ट्रात ‘काय ते द्या’चं राज्य”; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here