बंगळुरूमधील लहानगा मेस्सी! याचे व्हिडिओ पाहून तुम्ही सु्द्धा थक्क व्हाल….

सध्या बंगळुरूच्या पाच वर्षीय अ‍ॅरॉन राफेलचे व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या चिमुकल्याच्या टॅलेंटची सर्वत्र चर्चा होत आहे. अ‍ॅरॉनची दखल थेट जर्मन फुटबॉल संघाचा माजी कर्णधार रिअल माद्रिदचा मिडफिल्डर टोनी क्रुस यांनी सुद्धा घेतली आहे. क्रूस याने अ‍ॅरॉन राफेलला आपल्या प्रशिक्षण अकादमीमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. अ‍ॅरॉन राफेल हा लहान वयातच फुटबॉल खेळतोय त्याला टोनी क्रुसने फिरत्या टायरमध्ये बॉल मारून ट्रिक शॉट मारण्याचे चॅलेंज दिले होते, हे सुद्धा या लहानग्या अ‍ॅरॉन राफेलने अगदी सहज पूर्ण केले आहे.

( हेही वाचा : व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फिचर; शोधता येणार तारखेनुसार मेसेज)

सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल 

४३३, Sporf, BRFootball आणि इंडियन सुपर लीगसारख्या सोशल मिडिया हॅंडलद्वारे सुद्धा राफेलचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या सर्व व्हिडिओंवर कौतुकाचा वर्षाव होत असून त्याला लहानगा मेस्सी असे सुद्धा संबोधले जात आहे. या व्हिडिओला जवळपास ४० लाख व्ह्यूज आले आहेत. हर्ष गोयंका यांनी सुद्धा या व्हिडिओ शेअर केला आहे. अ‍ॅरॉन हा मेस्सीचा सुद्धा फॉलोवर आहे.

पहा अ‍ॅरॉन राफेलचा व्हिडिओ 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here