गर्भपातासाठी गोळ्या खात असाल तर…ही बातमी वाचा

112

गर्भपात हा कायद्याने गुन्हा आहे. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे गर्भपाताची औषध विक्री सर्रास नामाकिंत वेबसाइटवर व ऑनलाइन सुरु आहे. या बेकायदा औषधांच्या विक्रीवर कोणतेही नियंत्रण नाही. मेडीकलमध्ये ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व प्रिस्किप्शनशिवाय सर्रास मिळत आहेत. मात्र गर्भपाताची ही औषधं धोकादायक असल्याचं एका रिसर्चमधून समोर आलं आहे. गर्भपाताच्या औषधांमुळे नंतर होणा-या बाळाला कर्करोग होण्याचा धोका संभवतो, असे मत ह्यूस्टन येथील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास हेल्थ सायन्स सेंटरच्या संशोधकांनी नोंदवले आहे.

‘या’ औषधामुळे कर्करोगाचा धोका 

 गर्भपातासाठी वापरली जाणारी औषधं गर्भाशयाच्या संपर्कात आल्याने नंतर होणाऱ्या बाळाला कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘अमेरिकन जर्नल ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी’मध्ये प्रकाशित झाले आहेत. 17-OHPC हे औषध एक कृत्रिम प्रोजेस्टोजेन आहे जे 1950 आणि 1960 च्या दशकात महिलांनी वारंवार वापरले होते आणि आजही महिलांना हे औषध दिलं जातं. प्रोजेस्टेरॉन गर्भधारणेदरम्यान गर्भ वाढण्यास मदत करते आणि स्त्रीला प्रसूतीकळा लवकर येण्याला अडचणी निर्माण करतात यामुळं गर्भपाताचा धोका उद्भवतो.

भविष्यात कॅन्सरचा धोका अधिक 

ह्यूस्टनमधील यूटीएच हेल्थ स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथे हेल्थ प्रमोशन आणि बिहेवियरल सायन्सेस विभागातील अभ्यास आणि सहयोगी प्राध्यापक कॅटलिन सी. मर्फी यांनी सांगितलं की, गर्भधारणेदरम्यान औषध घेतलेल्या स्त्रियांच्या पोटी जन्मलेल्या मुलांमध्ये हे औषध न घेतलेल्या स्त्रियांच्या जन्मलेल्या मुलांच्या तुलनेत कर्करोगाचे प्रमाण दुप्पट आहे.आम्ही कोलोरेक्टल कॅन्सर, स्वादुपिंडाचा कर्करोग, थायरॉईड कर्करोग आणि इतर अनेक कर्करोग 1960 च्या दशकात आणि नंतर जन्मलेल्या लोकांमध्ये वाढत असल्याचे पाहिले आहे. या शोधादरम्यान संशोधकांनी जून 1959 ते जून 1967 दरम्यान प्रसूतीपूर्व काळजी घेतलेल्या महिलांवरील डेटा आणि कॅलिफोर्निया कॅन्सर रजिस्ट्रीमधील डेटाचे पुनरावलोकन केले. यात त्या काळात जन्मलेल्या आणि 2019 पर्यंत जीवंत असलेल्या व्यक्तिंमध्ये कर्करोगाचं संशोधन केलं. यातील 18 हजार 751 पेक्षा जास्त जिवंत असलेल्या लोकांपैकी हजारहून जास्त जणांना कर्करोगाचे निदान झाल्याचे आढळले. त्यात 234 नवजात अपत्यांना गर्भात असतानाच 17-OHPC चा धोका उद्भवला. गर्भधारणेच्या काळात ही औषधं घेतल्यानं भविष्यात कॅन्सरचा धोका वाढत असल्याचं निरीक्षण संशोधक मर्फी यांनी नोंदवलं.

गर्भपाताच्या औषधांमुळे सिंथेटिक हार्मोन्ससारखे साईड इफेक्ट्स पाहायला मिळतात. या औषधाचा गर्भाशयातील गर्भाशी संपर्क झाला तर पुढे हीच बाब जन्माला आल्यानंतर बऱ्याच वर्षांनीही अपत्यांना कॅन्सरचा धोका उद्भवण्यासाठी कारणीभूत ठरु शकते. मर्फी यांनी सांगितलं की, गर्भधारणेदरम्यान हे औषध घेतल्याने बाळांचा लवकर विकास होण्यात व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे काही दशकांनंतर कर्करोगाचा धोका वाढू शकतो. 17- ओएचपीसीचा कोणताही फायदा नाही आणि ते वेळेआधीच बाळाच्या जन्माचा धोकाही कमी करत नाही, असं मर्फी म्हणतात.

(हेही वाचा मुंबईकरांनो! ‘या’ भागात होणार पाणी कपात )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.