Adani Gas Share Price : अदानी टोटल गॅस शेअर हिंडेनबर्ग अहवालाच्या धक्क्यातून सावरला?

Adani Gas Share Price : अदानी टोटल गॅस शेअरने मागच्या काही महिन्यात पुन्हा एकदा वर्षातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. 

124
Gautam Adani : अदानी कुटुंबीयांनी एकाच दिवसात कमावले ४,२५१ कोटी रुपये

एकेकाळी भारतात आणि आशियातही सर्वोत्तम मूल्यांकन असलेला अदानी उद्योगसमुह हिंडेनबर्ग अहवालानंतर काहीसा कोलमडला. समुहातील कंपन्यांच्या किमती कृत्रिमरित्या फुगवल्या जात आहेत, असा अहवाल अमेरिकन संशोधन कंपनी हिंडेनबर्गने सादर केला. त्यानंतर २०२३ मध्ये कंपनीच्या शेअरमध्ये प्रचंड घसरण सुरू झाली. त्यानंतरचा काळ अदानी समुह आणि भारतीय शेअर बाजारांसाठीही आव्हानात्मक होता. पण, आता हळू हळू गौतम अदानी यांच्या मालकीचा हा समुह या धक्क्यातून सावरतोय. (Adani Gas Share Price)

याचा एक ताजा पुरावा म्हणजे गेल्या महिन्यात जेफरीज् या जागतिक दर्जाच्या संशोधन व ब्रोकरेज कंपनीने अदानी समुहाला दिलेला सुरक्षित गुंतवणुकीचा शेरा शेअरच्या वाढीला कारणीभूत ठरला आहे. गेल्या महिन्यातच अदानी टोटल गॅसचा शेअर ११ टक्क्यांनी वाढून १,०४७ पर्यंत वर गेला होता. जेफरीज् ने आपल्या अहवालात, ‘अदानी समुह जानेवारी २०२३ मध्ये आलेल्या हिंडेनबर्ग अहवालाच्या धक्क्यातून आता सावरत आहे. आणि समुहातील कंपन्या पुन्हा एकदा विस्ताराच्या प्रयत्नांत आहेत. मागणीचा विचार करता हा विस्तार अनाठायी नाही,’ असं म्हटलं होतं. तेव्हापासून समुहातील इतर कंपन्यांबरोबरच अदानी टोटल गॅसही शेअर बाजारात चांगली कामगिरी नोंदवत आहे. (Adani Gas Share Price)

शुक्रवारी कंपनीचा शेअर जवळ जवळ १ टक्क्याने घसरून ८८२ वर बंद झाला.  (Adani Gas Share Price)

New Project 2024 07 26T174031.490

(हेही वाचा – BJP : राजस्थानमध्ये सहप्रभारी म्हणून विजया रहाटकर यांची निवड)

अदानी टोटल गॅस या कंपनीला इक्रा रेटिंग एजन्सीने आता एए असं सुधारित रेटिंग दिलं आहे. २००६ मध्ये स्थापना झालेल्या आणि ५५० च्या आसपास कर्मचारी वर्ग असलेली ही कंपनी आता विस्ताराच्या उंबरठ्यावर आहे. ‘ई-मोबिलिटी, कम्प्रेस्ड गॅस, वाहतूक आणि खाणकामासाठी एलपीजी गॅस अशा क्षेत्रात कंपनी आता विस्तार करणार आहे. या विस्ताराची तयारी पूर्ण झाली आहे,’ असं अदानी टोटल गॅसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश मंगलानी यांनी सांगितलं आहे. (Adani Gas Share Price)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.