प्रवाशांना मिळेल कन्फर्म तिकीट; ‘या’ एक्सप्रेसला कायमस्वरूपी अतिरिक्त डबे जोडले जाणार

रेल्वेने साईनगर शिर्डी-विजयवाडा/काकीनाडा पोर्ट एक्सप्रेसला कायमस्वरूपी अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. याचा संपूर्ण तपशिल खालीलप्रमाणे…

साईनगर शिर्डी-विजयवाडा/काकीनाडा पोर्ट एक्सप्रेस गाड्यांमध्ये कायमस्वरूपी अतिरिक्त डबे

गाडी क्रमांक 17208/17207 साईनगर शिर्डी – विजयवाडा एक्सप्रेसला साईनगर शिर्डी येथून दिनांक 14 सप्टेंबर 2022 पासून आणि विजयवाडा येथून दिनांक 13सप्टेंबर2022 पासून एक अतिरिक्त शयनयान आणि सामान्य द्वितीय श्रेणी कोच जोडण्यात येईल.

ट्रेन क्र. 17206/17205 साईनगर शिर्डी – काकीनाडा पोर्ट एक्स्प्रेसला एक प्रथम वातानुकूलितसह द्वितीय वातानुकूलित कोच साईनगर शिर्डी येथून 13 सप्टेंबर 2022 पासून आणि काकीनाडा बंदर येथून 12 सप्टेंबर 2022 पासून जोडण्यात येईल.

ट्रेन क्रमांक 17208/17207 साठी सुधारित संरचना: एक प्रथम वातानुकूलितसह द्वितीय वातानुकूलित, एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, दोन गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी.

ट्रेन क्रमांक 17206/17205 साठी सुधारित संरचना: दोन प्रथम वातानुकूलितसह द्वितीय वातानुकूलित, दोन द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, दोन गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ४ सामान्य द्वितीय श्रेणी.

तसेच वरील गाड्यांमधील प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना त्यांनी ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी त्यांच्या पीएनआरची स्थिती तपासावी असे रेल्वेने सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here