Aditya Birla Textile : आदित्य बिर्ला समुहातील वस्त्रोद्योग कंपनी कुठली?

Aditya Birla Textile : फॅशन आणि रिटेल क्षेत्राबरोबरच बिर्ला समुह वस्त्रोद्योग क्षेत्रातही आहे 

19
Aditya Birla Textile : आदित्य बिर्ला समुहातील वस्त्रोद्योग कंपनी कुठली?
Aditya Birla Textile : आदित्य बिर्ला समुहातील वस्त्रोद्योग कंपनी कुठली?
  • ऋजुता लुकतुके

अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशात कार्यरत असलेली दोन उद्योग घराणी म्हणजे टाटा आणि बिर्ला. यातील बिर्ला घराणं खरंतर टाटांपेक्षाही जुनं आहे. कारण, ज्यावर्षी १८५७ चा स्वातंत्र्य लढा झाला आणि भारतातील कंपनी सरकार जाऊन ब्रिटिश अंमल तिथे सुरू झाला अगदी त्याचवर्षी घनश्यानदास बिर्ला यांच्या वडिलांनी या उद्योगाची मूहूर्तमेढ रोवली होती. तर जमशेटजी टाटा यांनी आपली पहिली कंपनी सुरू केली १९६७ मध्ये. पण, बिर्ला यांनी मुंबईत कापडी तागे, ज्यूट आणि एकंदरीतच वस्त्रोद्योगात आपले पाय रोवले होते. (Aditya Birla Textile)

(हेही वाचा- Maharashtra Vidhan Sabha Election 2024: ठरलं तर! पंतप्रधान मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा ‘या’ दिवशी होणार)

पण, खऱ्या अर्थाने या समुहाचा विस्तार केला तो त्यांचा मुलगा घनश्यामदास बिर्ला यांनी. पुढे घनश्यामदास यांची दोन मुलं आदित्य आणि कुमारमंगलम बिर्ला जी आताही कार्यरत आहेत त्यांनी हा डोलारा अगदी प्रत्येक उत्पादनापर्यंत नेला. आणि भारताबाहेरही विस्तार केला. सध्याच्या समुहाला नावही आदित्य बिर्ला समुह असं दिलेलं आहे. त्यांनी धातू, सिमेंट अशा अवजड उद्योगांना सुरुवात केली. पण, बिर्ला समुहाची खरी सुरुवात टेक्सटाईल म्हणजे वस्त्रोद्योगाने झाली आणि आता ती ओळख फॅशनपर्यंत पोहोचली आहे. आणि व्हॅन होसेन हा ब्रँड नावारुपाला आला आहे. पण, आपला मूळ उद्योग म्हणजे वस्त्रोद्योगही कंपनीने समुहाने सुरूच ठेवला आहे. (Aditya Birla Textile)

त्यासाठी समुहाने १९४९ मध्ये एक कंपनी सुरू केली जिचं नाव आहे जयश्री टेक्सटाईल्स. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथं या कंपनीचं मुख्यालय आहे. आणि त्यांचा ब्रँड तसंच उपकंपनीचं नाव आहे ग्रासिम. कॉटन आणि लोकरी कपड्यांसाठी ग्रासीम हा आजही अग्रगण्य ब्रँड आहे. इथलं कॉटन १०० टक्के अस्सल असावं यासाठी कंपनीने विशेष प्रयत्न केले आहेत. आणि त्यासाठी फ्रान्स, बेल्जिअम इथून तागे आणले जाऊन ते स्वीत्झर्लंड आणि इटलीहून मागवलेल्या यंत्रांच्या सहाय्याने विणले जातात. लिनन क्लब हा कंपनीचा ब्रँड त्यासाठीच प्रसिद्ध आहे. (Aditya Birla Textile)

(हेही वाचा- Ind vs NZ, 3rd Test : शेवटच्या ५ मिनिटांत भारतीय संघाने कशी केली हाराकिरी; जयसवाल आणि कोहलीही बाद )

कॉटन कापडाचे ३,००० पेक्षा जास्त प्रकार आतापर्यंत रिश्री इथल्या कारखान्यात तयार झाल्याचा कंपनीचा दावा आहे. लोकरी कपड्यांचं उत्पादन पूर्णपणे भारतात व्हावं असा कंपनीचा आग्रह होता. आणि त्यासाठी १९९५ मध्ये कंपनीने मध्यप्रदेशात भिंड इथं एक प्रकल्प सुरू केला आहे. आणि तेव्हापासून लोकर मिळवणं, ती विणणं आणि कपडा तयार कऱणं ही सगळी कामं भारतात होतात. १०० टक्के लोकर उत्पादन भारतात करणारी ही एकमेव कंपनी आहे. (Aditya Birla Textile)

महाराष्ट्रात कोल्हापूर, पश्चिम बंगालमध्ये रिश्री आणि मध्यप्रदेशात भिंड इथं कंपनीचे वस्त्रोद्योग प्रकल्प आहेत. (Aditya Birla Textile)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.