Advocate General of maharashtra : कोण आहेत महाराष्ट्राचे महाअधिवक्ता?

278
Advocate General of maharashtra : कोण आहेत महाराष्ट्राचे महाअधिवक्ता?

भारतामध्ये महाअधिवक्ता हा राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार असतो. हे पद भारतीय राज्यघटनेतल्या कलम १६५ नुसार तयार केलेलं आहे. हे पद केंद्र सरकारच्या स्तरावर भारतासाठी ॲटर्नी जनरल यांच्याशी संबंधित आहे. प्रत्येक राज्याचे राज्यपाल हे महाधिवक्ता म्हणून उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांपैकी पात्र असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करतात. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणजेच एजी म्हणून ज्येष्ठ वकील बीरेंद्र सराफ यांची नियुक्ती करण्यात आल्याची अधिसूचना महाराष्ट्र सरकारने घोषित केली. (Advocate General of maharashtra)

घटनेच्या कलम १६५ नुसार उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्तीची एजी म्हणून नियुक्ती करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. राज्यपालांनी राज्य सरकारने सराफ यांना राज्याचे एजी होण्यासाठी केलेल्या शिफारशीला मंजुरी दिली. त्यानंतर मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी याबाबत अधिसूचना जारी केली. (Advocate General of maharashtra)

(हेही वाचा – Malabar Hill : मुंबईतलं प्रशस्त ठिकाण! का करतं हे ठिकाण लोकांना आकर्षित?)

आशुतोष कुंभकोणी यांचा राजीनामा राज्य सरकारने स्वीकारल्यानंतर एजी या पदावर बिरेंद्र सराफ यांची नियुक्ती केली गेली. आशुतोष कुंभकोणी हे २०१७ सालापासून राज्याचे एजी होते. त्यांनी सलग तीन सरकारांसोबत काम केले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी १५ डिसेंबरपासून महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणजेच एजी म्हणून ज्येष्ठ वकील बिरेंद्र सराफ यांची नियुक्ती केल्याची अधिसूचना महाराष्ट्र सरकारने घोषित केली होती.

फेब्रुवारी २०२० साली ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्त झालेले बिरेंद्र सराफ हे जवळपास २५ वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत. मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून त्यांनी आपलं एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी ज्यूडीकल इंटरव्हेन्टेशन इन अर्बीट्रॅशन्स इन इंडिया या विषयावर पीएचडी केली. मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांची सर्वात जुनी संघटना असलेल्या मुंबई बार असोसिएशनचे मानद सचिव म्हणूनही बिरेंद्र सराफ यांनी सहा वर्षं काम केलं. सध्या ते मुंबई बार असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. (Advocate General of maharashtra)

(हेही वाचा – Toll: वरळी सी लिंक आणि समृद्धी महामार्गाच्या टोलमध्ये घोळ! राज्य सरकारची मोठी कारवाई)

बिरेंद्र सराफ हे आताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या चेंबरचा एक भाग होते. ते अलीकडच्याच काही हाय-प्रोफाइल प्रकरणांमध्ये दिसले होते. जसे की, अभिनेत्री कंगना रणौत, माजी BCCI अध्यक्ष सौरव गांगुली आणि NCB चे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे वडील इत्यादिंसाठी त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे. (Advocate General of maharashtra)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.