Aegis Logistics : एजीस लॉजिस्टिक्सच्या शेअरवर संशोधन संस्थांचा काय आहे अहवाल?

Aegis Logistics : एजीस लॉजिस्टिक्स ही देशातील मध्यम आकाराची लॉजिस्टिक्स कंपनी आहे.

35
Aegis Logistics : एजीस लॉजिस्टिक्सच्या शेअरवर संशोधन संस्थांचा काय आहे अहवाल?
  • ऋजुता लुकतुके

मोतीलाल ओस्वाल फायनान्शिअल सर्व्हिसेस या देशातील आघाडीच्या वित्तीय संशोधन संस्थेनं एजीस लॉजिस्टिक्स शेअरला अलीकडेच न्यूट्रल रेटिंग देताना कंपनीचं लक्ष्य ७९५ रुपयांपर्यंत वाढवलं आहे. मोतीलाल ओस्वाल कंपनीच्या ताज्या ब्रोकरेज अहवालात एजीस लॉजिस्टिक्सवर भाष्य करण्यात आलं आहे. एजीस लॉजिस्टिक्स ही लॉजिस्टिक्स क्षेत्रातील मध्यम आकाराची कंपनी आहे. १९५६ पासून माल वाहतुकीच्या क्षेत्रात ही कंपनी कार्यरत आहे आणि सध्या कंपनीचं भागभांडवल हे २७,८१३ कोटी रुपये इतकं आहे. तर कंपनीचा शेअर सध्या राष्ट्रीय शेअर बाजारात ७९६ अंशांवर आहे.

कंपनी देत असलेल्या सेवेतून त्यांना महसूल मिळतो. शिवाय कंपनीची गोडाऊन भाड्याने दिल्यामुळे मिळणारे उत्पन्न आणि सेवेसाठी मिळणारं कमिशन हे कंपनीचे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत.

(हेही वाचा – HCL Technologies Share Price : एचसीएल टेकमधील रोशनी नादर यांच्या गुंतवणुकीला सेबीचा हिरवा कंदील)

New Project 2024 11 23T225524.889

सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीचा ताळेबंद अलीकडेच कंपनीने सादर केला आहे आणि त्यानुसार या तिमाहीत कंपनीची कामगिरी समाधानकारक होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत कंपनीचा महसूल ८ टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि कांडला बंदरातील जागा या पूर्णपणे वापरात आल्या आहेत. तर मंगलोर आणि कोची इथं असलेल्या जागा २०२५ मध्ये कार्यान्वित होणार आहेत. ही एक मुख्य सकारात्मक माहिती या ताळेबंद मांडणीतून मिळते.

याशिवाय मुंबईतही कंपनी दोन जागांमध्ये आपल्या सेवांचा विस्तार करणार आहे. पण, ही माहिती गुंतवणूकदारांसाठी जुनी आहे आणि या विस्तार गृहित धरूनच कंपनीचा शेअर गेल्या काही दिवसांत वधारला आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षांत कंपनीच्या शेअरवर गुंतवणुकदारांना मिळणारं उत्पन्न शेअरमागे १३ टक्के इतकंच असेल असा अंदाज मोतीलाल ओस्वाल यांनी अहवालात मांडला आहे.

(टीप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीवर गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरमध्ये खरेदी विक्रीचा सल्ला देत नाही)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.