अ‍ॅपलपाठोपाठ आता गुगलही चीनमधून भारतात येणार, रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार

कोरोना काळात चीनकडून करण्यात आलेल्या मुजोरीमुळे अनेक देशांनी चीनला बॉयकॉट केले होते. त्यामुळे भारतासह जगभरातील अनेक देशांनी चीनवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे स्मार्टफोन आणि इलेक्ट्ऱनिक्स क्षेत्रात अग्रेसर असलेल्या चीनला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत.

अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी आपले प्रकल्प चीनमधून इतर देशांत हलवले आहेत. अ‍ॅपलने चीनमधील आपली कंपनी भारतात हलवण्याची तयारी सुरू केली असतानाच आता गुगल देखील चीनमधील आपले बस्तान भारतात हलवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार

गुगल आपले मॅन्युफॅक्चरिंग असेंब्ली युनिट चीनमधून भारतात हलण्यासाठी सज्ज असल्याचे सांगण्यात येत आहे. नुकतीच फॉक्सकॉन ही सेमीकंडक्टर बनवणारी कंपनी भारतात आली आहे. त्यावरुन भारत आणि गुजरात राज्यांमध्ये वाद सुरू असताना आता गुगलबाबत माहिती येत आहे. चीनवर असलेल्या निर्बंधांमुळे अनेक टेक कंपन्या या भारत आणि इतर देशांत येण्यासाठी इच्छुक आहेत. यामुळे भारतात गुंतवणुकीसोबतच तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पिक्सल फोन बनवणार

गुगल भारतात पिक्सल स्मार्टफोन बनवणार आहे. यासाठी गुगलने भारतीय उत्पादकांकडून 10 लाख पिक्सल स्मार्टफोन तयार करण्यासाठी बोली सादर करण्याची घोषणा केली आहे. एकूण स्मार्टफोन उत्पादनांपैकी 10 ते 20 टक्के उत्पादन गुगल भारतात घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी पिक्सलचे सर्वाधिक उत्पादन हे चीनमध्ये होत होते.

सरकारच्या योजनेचा फायदा

देशात स्मार्टफोन निर्मितीला चालना देण्यासाठी भारत सरकारने PLI(Production Linked Initiative)ही योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे भारत मोबाईल उत्पादन केंद्र म्हणून नावारुपाला येणार आहे. जगभरात प्रसिद्ध असलेले अ‍ॅपलचे आयफोन 14 सोडून इतस सर्व आयफोन हे भारतात असेंबल होत असल्याचे सांगण्यात येते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here