Zomato, Swiggy प्रमाणे आता Ola सुद्धा १० मिनिटांत करणार फूड डिलिव्हरी!

141

जर तुम्हाला खूप भूक लागली असेल आणि काहीतरी मस्त गरमा-गरम खावसं वाटत असेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका. कारण झोमॅटो आणि स्विगीनंतर आता ओला देखील 10 मिनिटांत तुम्हाला घरपोच फूड डिलिव्हर करू शकणार आहे. ओला कंपनीने या सेवेची चाचणीही सुरू केली आहे. तर फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोनेही काही दिवसांपूर्वी अशी सेवा सुरू करण्याबाबत बोलले आहे आणि स्विगीही त्यासाठी तयारी करत आहे.

बंगळुरूमध्ये चाचणी सुरू

ओलाने बंगळुरूमध्ये या नव्या सेवेची चाचणी सुरू केली आहे. खाद्यपदार्थ जलद वितरणासाठी कंपनी आपली ग्रॉसरी डिलिव्हरी सर्व्हिस ओला डॅश (Ola Dash) वापरत आहे. मात्र, सध्या या सेवेच्या मेनूमध्ये केवळ मर्यादित खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. ओलाने आपल्या 10 मिनिटांच्या फूड डिलिव्हरी सेवेमध्ये खिचडी, पिझ्झा आणि रोल यासारख्या पदार्थांचा समावेश केला आहे. त्याचे अन्न पूर्णपणे ताजे असेल असा कंपनीचा दावा आहे. ओलाने काही वर्षांपूर्वी फूड डिलिव्हरी कंपनी फूडपांडा देखील विकत घेतली. याशिवाय ओला आपल्या ओला फूड्स नावाच्या कंपनीअंतर्गत खिचडी एक्सपेरिमेंट, पराठा एक्सपेरिमेंट, बिर्याणी एक्सपेरिमेंट आणि ब्रेकफास्ट एक्स्प्रेस या नावाने किचन चालवते.

(हेही वाचा – Uber नंतर आता Ola नेही वाढवले भाडे, ‘या’ शहरांतील प्रवास महागला!)

या उपक्रमावर अनेक ठिकाणी होतेय टीका

फूड डिलिव्हरी कंपन्या 10 मिनिटांत अन्न पोहोचवण्याच्या सेवेवर सातत्याने भर देत आहेत. मात्र यावरून त्यांना अनेक टीकेला सामोरे जावे लागले आहे. पूर्वी, जेव्हा झोमॅटोने ही सेवा सुरू करण्याबद्दल बोलले होते, तेव्हा लोकांनी फूड डिलिव्हरी पार्टनर्सच्या सुरक्षिततेबद्दल आणि त्यांच्यावरील दबावाबद्दल चिंता व्यक्त केली होती. यावर झोमॅटोने स्पष्ट केले होते की ती ही सेवा मर्यादित क्षेत्रात सुरू करणार आहे. यासोबतच मेन्यूमध्ये अशा गोष्टींचाही समावेश केला जाईल, ज्या तयार करून लवकरात लवकर डिलिव्हर करता येतील. यापूर्वी, जेव्हा ग्रोफर्स (आता ब्लिंकिट) ने 10 मिनिटांत किराणा सामान पोहोचवण्याची सेवा सुरू करण्याविषयी बोलले होते, तेव्हाही कंपनीला अशाच टीकेला सामोरे जावे लागले होते. अलीकडेच ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठवून सांगितले होते की, ते आता कंपनीच्या दैनंदिन कामापासून थोडे लांब राहतील. त्याऐवजी, ते नवीन विभाग आणि व्यवसायांवर लक्ष केंद्रित करतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.