आता Truecaller मध्ये AI वर आधारित कॉल रेकॉर्डिंग; जाणून घ्या तुम्हाला कसा होईल लाभ?

212

ट्रू कॉलरच्या म्हणण्यानुसार कंपनीने आपल्या 350 मिलियन आयफोन आणि अँड्रॉइड ऍक्टिव्ह युजर्ससाठी ए आय संचालित एक कॉल रेकॉर्ड सुविधा लॉन्च केली आहे. ही सुविधा येणाऱ्या काही महिन्यांमध्ये अमेरिका आणि त्यानंतर जगातील इतर वेगवेगळ्या देशांमध्ये सुरू केली जाईल. कंपनीने सांगितले की, ए आय बेस्ड असलेले हे ट्रू कॉलरचे हे फिचर इतर प्लॅटफॉर्म्सपेक्षा वेगळे आहे.

या कॉल रेकॉर्डिंग फिचरला ट्रू कॉलरने 2018 साली अँड्रॉइड युजर्ससाठी आणलं होतं. पण या फिचरच्या एक्सिसीबीलिटी ईपीआयपर्यंत पोहोचण्याकरता गुगलने बंधन घातले होते. त्यामुळे त्यावेळेस हा फिचर काढून टाकण्यात आला होता.

हे फिचर तुमचे कॉल रेकॉर्ड करण्याव्यतिरिक्त तुमचे कॉल्स टेक्स्ट मॅसेजमध्येही ट्रान्सलेट करू शकतात. महत्वाच्या मीटिंगमध्ये हे फिचर फार उपयोगी पडू शकते. म्हणजे तुम्ही मीटिंगमध्ये ज्या विषयावर चर्चा केली असेल त्या विषयावरची चर्चा तुमच्याकडे लिखित स्वरूपात उपलब्ध असेल. सध्या या फिचरमध्ये फक्त इंग्रजी भाषेचा समावेश आहे.

अँड्रॉइड फोन युजर्स आपले कॉल रेकॉर्ड करण्यासाठी डायरेक्ट ट्रू कॉलर डायलर किंवा इतर फोन डायलर्स मध्येही कॉल रेकॉर्डिंगचे एक फ्लोटिंग बटन प्रेस करून आपले कॉल रेकॉर्ड करू शकतात. पण आयफोन युजर्सना या फिचरचा वापर करण्यासाठी प्रत्यक्ष ट्रू कॉलर ऍपच वापरावा करावा लागेल.

यामध्ये एक समस्या अशी आहे की, ट्रू कॉलर कॉल रेकॉर्डिंग ऍपचा वापर करताना तुम्ही कॉल रेकॉर्ड करायला सुरुवात केली तर समोरच्या माणसाला एक बीप ऐकू येते. या बीपमुळे समोरची व्यक्ती तुम्ही त्यांचा कॉल त्यांच्या अनुमतीशिवाय रेकॉर्ड करत आहात हे समजू शकते.

(हेही वाचा AI : पाच वर्षांत एआय करणार मानवतेचा नाश; जगातील प्रमुख सीईओंनी दिला इशारा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.