एअर एशिया आणि शुगरबॉक्स अंतर्गत प्रवाशांना आता विमानात मोफत OTT कंटेंट पाहण्याची संधी मिळणार आहे. एअर एशिया आणि शुगरबॉक्स यांनी संयुक्तपणे एअरफ्लिक्स (AirFlix) सेवा सुरू केली आहे. एअरफ्लिक्स सेवेअंतर्गत प्रवासांना ६००० तासांपेक्षा जास्त एचडी कंटेंट, १ हजारांहून अधिक हॉलिवूड- बॉलिवूड चित्रपट, वेबसिरीज पाहण्याची संधी मिळणार आहे.
( हेही वाचा : ठाणे महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! परीक्षेविना होणार निवड, मिळेल ६० हजारांपर्यंत पगार)
विविध सेवांचा अनुभव
एअरफ्लिक्स सेवेमध्ये युजर्सला विमानात इंटरनेटशिवाय ओटीटी कंटेटचा अनुभव घेता येणार आहे. एअर एशिया आणि शुगरबॉक्सची ही सेवा पेटंट क्लाउडवर आधारित आहे. युजर्सला 1Gbps पर्यंत स्पीड आणि 8TB स्टोरेज मिळेल. युजर्स विमानात गेमिंगचा अनुभव तसेच शॉपिंग सुद्धा करू शकणार आहेत.
एअर एशिया व शुगरबॉक्स अंतर्गत सेवा
आतापर्यंत ओटीटी कंटेट पाहण्याची सुविधा फक्त एअर विस्तारामध्ये उपलब्ध होती. पण विस्ताराचे प्रवासी वेबसिरीज पाहणे, खरेदी करणे या सुविधांचा लाभ घेऊ शकत नाही. परंतु एअर एशियाने एअरफ्लिक्सच्या माध्यमातून विमान प्रवासाचा अनुभव बदलण्यासाठी ही सुविधा सुरू केली आहे.
प्रवाशांना मिळणार या सुविधा
- OTT कंटेट पाहण्याची सुविधा
- बातम्या
- पॉडकास्ट
- इन-फ्लाइट एफ अँड बी ऑर्डरिंग सुविधा