- ऋजुता लुकतुके
अजूनही प्रत्येकाला विमान प्रवासाचं अप्रूप असतं आणि विमानात सेवा बजावणाऱ्या टापटीप दिसणाऱ्या हवाई सुंदरी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतात. मोफत जगभर प्रवास करता येतो म्हणूनही काहींना या व्यवसायाचं आकर्षण असतं. हवाई सुंदरींना नेमका किती पगार मिळतो ते आज पाहूया, (Air Hostess Salary)
(हेही वाचा – Maha Vikas Aghadi ला मोठा धक्का; अबु आझमींनी शिवसेना उबाठामुळे मविआतून बाहेर पडण्याचा घेतला निर्णय)
प्रवासी विमानात चढल्यावर त्याचं स्वागत करणं, त्यांना काय हवं, नको ते पाहणं, त्यांचा विमान प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी त्यांची मदत करणं हे हवाई सुंदरींचं कामाचं स्वरुप आहे. केबिन सहाय्यक किंवा केबिन कर्मचाऱ्यांमध्ये हवाई सुंदरीही मोडतात. प्रत्येक विमान कंपनीकडून मिळणारा पगार हा वेगवेगळा असून शकतो. पण, सरासरी काढली तर हवाई सुंदरींचा सरासरी सुरुवातीचा पगार हा ४.५ ते ५ लाख रुपये इतका असतो आणि अनुभवानुसार वाढत जाऊन तो १२ ते १५ लाखांपर्यंतही जाऊ शकतो. शिवाय हवाई सुंदरींना रोख भत्ते, नफ्यातील हिस्सेदारी आणि कंपनीचे शेअरही मिळतात. त्यातूनही पगाराची रक्कम वाढते. (Air Hostess Salary)
(हेही वाचा – Station Master Salary : स्टेशन मास्तरना महिन्याला किती पगार मिळतो?)
वर म्हटल्याप्रमाणे, विमान कंपनीनुसार पगाराची रक्कम बदलत जाते आणि भारतात इंडिगो कंपनीचे पगार हे तुलनेनं सगळ्यात कमी आहेत. तर सगळ्यात जास्त पगार हे एमिरेट्स कंपनीचे आहेत. विमान कंपन्यांचे सरासरी वार्षिक पगार बघूया, (Air Hostess Salary)
(हेही वाचा – Maharashtra Legislature Special Session 2024 : विरोधी पक्षांचे आमदार शपथ घेणार नाहीत; नेमकं कारण काय?)
देशांतर्गत विमान सेवा आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणं यांच्यासाठी मिळणारे भत्ते वेगवेगळे आहेत. शिवाय या क्षेत्रात तुमचा अनुभव हा वयाबरोबरच तुमच्या उड्डाणाच्या तासांप्रमाणे मोजला जातो. तुमचे उड्डाणाचे तास जितके जास्त तितकी महत्त्वाची जबाबदारी तुम्हाला मिळत जाते. आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी हा अनुभव जास्त महत्त्वाचा ठरतो. (Air Hostess Salary)
(हेही वाचा – Loco Pilot Salary : रेल्वेतील लोको पायलटचं मासिक वेतन नेमकं किती असतं?)
प्रवाशांना सुविधा आणि सुरक्षा पुरवण्यात तत्परता, चांगलं संवाद कौशल्य, प्रसन्न व्यक्तिमत्त्व, प्रथमोपचारांची माहिती, अपघात, संकटांच्या वेळी लागणारं प्रसंगावधान, प्रवाशांचा जीव वाचवण्याचं कौशल्य असे गुण हवाई सुंदरी होण्यासाठी आवश्यक आहेत आणि ते तुमच्याकडे आहेत की नाही हे पाहिलं जातं. किंवा त्याचं प्रशिक्षण दिलं जातं. (Air Hostess Salary)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community