ajanta ellora caves : काय आहे अजिंठा लेण्यांचा भव्य दिव्य इतिहास?

21
ajanta ellora caves : काय आहे अजिंठा लेण्यांचा भव्य दिव्य इतिहास?

अजिंठा लेण्या या भारतातल्या महाराष्ट्र राज्यात असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून अस्तित्वात असलेल्या ३० दगडी लेण्या आहेत. अजिंठा लेणी हे युनेस्कोचं जागतिक वारसा असलेलं स्थळ आहे. कलेचा सर्वोत्कृष्ट नमुना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लेण्यांमध्ये प्राचीन भारतीय कलेची झलक आहे. या लेण्यांमध्ये भित्तीचित्रे आणि कातळात कोरलेली शिल्पे आहेत. या चित्रांद्वारे आणि शिल्पांच्या माध्यमातून वेगवेगळे भाव कोरण्यात आले आहेत.

अजिंठा लेणी या दगडाच्या ७५ मीटर एवढ्या भिंतींमध्ये कोरलेल्या विविध बौद्ध काळातले प्राचीन मठ, आणि उपासनागृहे दर्शवलेली आहेत. तसंच या गुंफांमध्ये गौतम बुद्धांचे भूतकाळातले जीवन आणि पुनर्जन्म दर्शविणारी चित्रे, आर्यसुराच्या जातकमालामधल्या सचित्र कथा आणि बौद्धांची दगडी शिल्पे देखील आहेत. (ajanta ellora caves)

(हेही वाचा – Maharashtra Vidhansbaha 2024: महाराष्ट्रात वाजणार महायुतीच्या प्रचाराचे बिगुल; धुळ्यात पंतप्रधान मोदींची ८ नोव्हेंबरला सभा)

प्राचीन भारतात या लेणी भिक्षूंसाठी तसंच व्यापारी आणि यात्रेकरूंसाठी एक विश्रांतीची जागा होती. भारतीय इतिहासात भित्तीचित्रे विपुल प्रमाणात तर होतीच, पण अजिंठा इथल्या १, २, १६ आणि १७ क्रमांकांच्या लेण्यांमध्ये प्राचीन भारतीय भित्तीचित्रांचा सर्वात मोठा संग्रह आहे.

पूर्वी अजिंठा लेणी दाट जंगलाने झाकलेली होती. १८१९ साली एक जॉन स्मिथ नावाचा ब्रिटीश अधिकारी वाघाच्या शिकारीकरिता जंगलात गेला होता. त्यावेळी त्याचं लक्ष दख्खनच्या पठारावर असलेल्या वाघूर नदीच्या U आकाराच्या घाटाच्या खडकाळ भागाकडे गेलं. तिथे त्याला उत्तरेकडच्या भिंतीमध्ये लेणी असलेल्या आढळून आल्या. घाटाच्या आत अनेक धबधबे आहेत. जेव्हा नदीला उधाण आलेलं असतं तेव्हा गुंफांच्या बाहेरूनही नदीचा खळखळाट ऐकू येतो. (ajanta ellora caves)

(हेही वाचा – dhanteras rangoli : तुम्ही धनत्रयोदशीला रांगोळी काढता का?)

वाहतूक

एलोरा लेण्यांसोबतच अजिंठा हे महाराष्ट्रातलं प्रमुख पर्यटन स्थळां पैकी एक आहे. हे स्थळ महाराष्ट्रातल्या जळगाव या ठिकाणी शहरापासून सुमारे ५९ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. तसंच औरंगाबाद या शहरापासून हे स्थळ १०४ किलोमीटर आणि मुंबईच्या पूर्व-ईशान्य दिशेला ३५० किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. अजिंठा लेणी हे एलोरा लेण्यांपासून १०० किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे.

या हिंदू, जैन आणि बौद्ध लेणी आहेत. या लेण्या अजिंठा कालखंडातल्या शेवटच्या लेण्या आहेत. अजिंठा लेण्यांची शैली एलोरा लेणी आणि एलिफंटा लेणी, औरंगाबाद लेणी, शिवलेणी लेणी आणि कर्नाटकातली गुहा मंदिरे यांसारख्या इतर ठिकाणी देखील आढळून येते.

या ठिकाणी पोहोचण्यासाठी जवळचे सर्वात जवळ असलेली जळगाव आणि संभाजी नगर आणि मुंबई ही विमानतळं आहेत. तसंच जळगाव, भुसावळ आहेत रेल्वेमार्गही जवळ आहेत. (ajanta ellora caves)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.