वाघांमध्ये गॅंगवॉर? त्यानंतर काय घडले…वाचा..

147

आलापल्ली वन विभागात असलेल्या आल्लापल्ली वनपरिक्षेत्रातील नेंडर कक्ष क्र. १२ मध्ये एक पट्टेदार वाघ रविवारी मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागात खळबळ माजली आहे. आलापल्ली वनविभागात वाघाचे अस्तित्व असून हा भाग घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. या ठिकाणी वाघासह इतर वन्यप्राणी मोठ्या संख्येने पहायला मिळतात. सदर जंगलात वाघ आपआपल्या कार्यक्षेत्रात दबदबा निर्माण करून ठेवतात. दरम्यान नवीन वाघाने जंगलात शिरकाव केला असेल आणि यातच झालेल्या वर्चस्वाच्या लढाईत, दीड वर्षाच्या नर जातीच्या एका वाघाचा मृत्यू शनिवारी रात्री झाला असल्याचा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

( हेही वाचा : ‘व्हॅलेंटाइन डे’चा ट्रेंड भारतात नक्की कधीपासून सुरु झाला? )

अधिक तपास सुरु

जंगलातील नेंडर कक्ष क्र. १२ मध्ये सदर घटना जंगलात लावलेल्या ट्रॅप कॅमेरात कैद झाली आहे का? याचा सुद्धा वनाधिकारी शोध घेत आहेत तर मागील महिन्यात आलापल्ली वनपरिक्षेत्रातील मौसम येथे एका पट्टेदार वाघिणीची शिकार करण्यात आली होती. त्यामुळे वनविभागाने या प्रकरणाचाही गांभीर्याने विचार करुन तपास करणार आहे.

वाघाचा मृत्यू…

वाघाच्या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थली दाखल झाले असून याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी पोहोचले असून शवविच्छेदनातून मृत्युचा उलगडा होणार आहे. प्रस्थापित परिक्षेत्रात आधीपासून असलेला वाघ अन्य कोणत्याही दुसऱ्या नर वाघाला आपल्या परिक्षेत्रात येऊ देत नाही. त्यामुळे दोन नर वाघ आमने- सामने आल्यास त्यांच्यात लढाई होण्याचे प्रसंग अनेक वेळा होतात. ही लढाई इतकी भीषण असते की दोन्ही वाघ गंभीर जखमी होतात. त्यात कमजोर असलेला वाघ हार पत्करून निघून जातो किंवा प्रसंगी त्याचा मृत्यू ओढवतो. या वाघाचा मृत्यू त्यातूनच झाला असण्याची शक्यता वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.