सोशल मीडियातील सर्वाधिक वापरले जाणारे अॅप्लिकेशन म्हणजे व्हॉट्सअॅप. व्हॉट्सअॅपमुळे कोणाशीही कधीही बोलता येणं शक्य होत असल्याने व्हॉट्सअॅपचा वापर करोडो लोक करतात. सध्या अशी चर्चा सुरू आहे की, व्हॉट्सअॅपवर कॉल रेकॉर्डिंग करता येणं शक्य आहे. पण ते खरं आहे का…
(हेही वाचा – Whatsapp: कोणीही वाचू नये असे Secret Chats लपविण्यासाठी ‘या’ Trick करा फॉलो)
चॅटिंग, व्हिडीओ आणि ऑडिओ कॉलिंगसाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सअॅपवर कॉल रेकॉर्डिंग करता येते का? अधिकृत फिचर नसले तरी त्यासाठी वेगळे अॅप वापरून रेकॉर्डिंग केले जाऊ शकते. तुम्हाला देखील व्हॉट्सअॅपवर आलेला कॉल रेकॉर्ड करायचा असल्यास कोणत्या पद्धतीने व्हॉट्सअॅपवर आलेला कॉल रेकॉर्ड करू शकतात, यासाठी जाणून घ्या खालील स्टेप्स…
मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपवर कॉल रेकॉर्ड करण्यासाठी तुम्हाला एका थर्ड पार्टी अॅपची मदत घ्यावी लागेल. यासाठी व्हॉट्सअॅपवर कॉल रेकॉर्ड करण्याचे अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. त्यातील एक म्हणजे कॉल रेकॉर्डर क्युब एसीआर
या स्टेप्स फॉलो करा
- हे अॅप गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करा.
- फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन अॅक्सेसेबिलिटी ऑप्शनमध्ये या अॅपच्या अॅप कनेक्टरला एनेबल करा.
- आवश्यक परमिशन दिल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅप कॉल्सच्या ऑप्शनला ऑन करावे लागेल.
- यानंतर तुम्ही ऑटो रेकॉर्डिंग किंवा मॅन्युअल पद्धतीने सुद्धा कॉल्स रेकॉर्ड करू शकता.