उन्हाळ्यात फिरायला जाताय? बॅग पॅक करताना या गोष्टी नक्की सोबत ठेवा…

197

उन्हाळ्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या पडत असल्यामुळे अनेक लोक सहलीला जातात. कडक उन्हामुळे घाम, थकवा येणे अशा अनेक समस्या उद्भवतात. यामुळे प्रवास करणे खूप कठीण होते. या उन्हाळ्यात तुम्ही सहलीला जाण्याचा विचार करत असाल आणि प्रवासादरम्यान होणारा त्रास टाळायचा असेल तर तुमची बॅग पॅक करताना या गोष्टी जरूर लक्षात ठेवा.

टॉवेल

उन्हाळ्यात घामामुळे संसर्ग होऊ शकतो, त्यामुळे टॉवेल आणि ओले वाइप्स सोबत ठेवा. वेळोवेळी त्वचा स्वच्छ करा. असे केल्याने संसर्गाचा धोका कमी होईल.

New Project 9 5

स्कार्फ, टोपी

उन्हापासून बचाव करण्यासाठी आपण आपल्या बॅगमध्ये टोपी किंवा स्कार्फ ठेवणे आवश्यक आहे.

सनग्लासेस/गॉगल

उन्हाळ्यात प्रवास करताना बॅगेत सनग्लासेस ठेवा. यामध्ये तुम्ही स्टायलिश तर दिसालच पण उन्हापासून तुमचे संरक्षणही होईल. यामुळे तुमच्या डोळ्यांचे सुद्धा संरक्षण होईल.

परफ्यूम

उन्हाळ्यात आपल्याला खूप घाम येतो, त्यामुळे आपण आपल्या बॅगमध्ये बॉडी परफ्यूमचा समावेश केला पाहिजे.

( हेही वाचा : आंब्याचे पदार्थ लज्जतदार; स्वादिष्ट नाना प्रकार! )

सनस्क्रीन

टॅनिंग टाळण्यासाठी सनस्क्रीन लोशन खूप महत्वाचे आहे. सनस्क्रीन सूर्यप्रकाशापासून आपल्या त्वचेचे संरक्षण करेल. अशावेळी चांगला एसपीएफ असलेले सनस्क्रीन लोशन वापरा.

हलके आरामदायक कपडे

बॅग पॅक करताना हलके व आरामदायक कपडे सोबत ठेवा, तसेच प्रवासात सैल कपडे घाला. यामुळे तुम्हाला कमी घाम येईल, शक्यतो सुती कपडे वापरा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.