आता अ‍ॅलेक्सावर ऐका आजीच्या आवाजातील गोष्ट

अ‍ॅलेक्सा Play Song, अ‍ॅलेक्सा आजच्या हवामानाविषयी माहिती दे अशा सर्व इच्छा पूर्ण करणारी अ‍ॅलेक्सा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. मात्र, आवाजावर आधारित तंत्रज्ञानावर काम करणारी ही व्हर्चुअल असिस्टंट अ‍ॅलेक्सा आता तुमच्या प्रियजनांच्या आवाजात तुम्हाला गोष्ट वाचून दाखवणार आहे. लवकरच ‘आजीच्या आवाजात’ गोष्टी वाचून दाखवण्यासाठी अ‍ॅलेक्सा सज्ज होणार आहे. हे आगळेवेगळे वैशिष्ट्य विकसित करण्यासाठी सध्या अ‍ॅमेझॉनमधील अ‍ॅलेक्साची टीम प्रयत्नशील आहे.

( हेही वाचा : कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश! १०० टक्के रिक्त पदे भरण्यास मान्यता)

प्रियजनांच्या आवाजात गोष्टी

लास वेगासमध्ये २२ जून रोजी संपन्न झालेल्या अ‍ॅमेझॉनच्या ‘री:मार्स’ या वार्षिक परिषदेत याविषयी माहिती देण्यात आली. प्रियजनांचा आवाज ऐकण्यासाठी संबंधित व्यक्तीचे मिनिटभराचे संभाषण पुरेसे आहे असे अ‍ॅमेझॉनचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि अ‍ॅलेक्साचे प्रमुख शास्त्रज्ञ रोहित प्रसाद यांनी यावेळी स्पष्ट केले. एक मिनिटापेक्षाही कमी रेकॉर्डिंगमधून उच्च दर्जाच्या आवाजाची निर्मिती कशी करता येईल यादृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे. असेही प्रसाद यांनी सांगितले.

यादरम्यान अ‍ॅलेक्सा माझी आजी वाचत असलेली विझार्ड ऑफ ओझी ही गोष्ट पूर्ण वाचून दाखवशील का? अशी विचारणा अ‍ॅलेक्साला एका लहानग्याने केली. यावर अ‍ॅलेक्साने तात्काळ होकार दिला आणि आपल्या आवाजात बदल करून त्याच्या खऱ्या आजीच्या आवाजात गोष्ट वाचली. अशाप्रकारे अ‍ॅलेक्सा येत्या काळात नव्या अपडेटसह दाखल होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here