Amazon वरून शूज खरेदी करताय? मग आधी ते पायात घालून तर बघा, काय आहे भन्नाट फीचर?

ई-कॉमर्स साइट Amazon नेहमीच ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स लाँच करत असते. त्याप्रमाणेच अॅमेझॉनने नुकतेच एक नवीन फीचर लाँच केले आहे. या फीचरचा वापर करून तुम्ही कोणतेही प्रोडक्ट खरेदी करण्यापूर्वी ते ट्राय करून पाहू शकतात. अॅमेझॉनने एक नवीन इंटरअॅक्टिव्ह मोबाइल एक्सपीरिअन्स लाँच केले आहे. यासह, ग्राहकांना iOS अॅमेझॉन शॉपिंग अॅपवर शूज वर्च्युअली ट्राय करता येणार आहेत.

कोणत्या कंपनीचे शूज करता येणार ट्राय

अॅमेझॉनने असे सांगितले जात आहे की, ही सर्व्हिस सध्या यूएस आणि कॅनडामधील ग्राहकांसाठी जारी करण्यात आली आहे. अॅमेझॉन फॅशनने शूजसाठी व्हर्च्युअल ट्राय-ऑन हे फीचर लाँच केले आहे. या ऑगमेंटेड रियलिटीमुळे, ग्राहकांना त्यांच्या पायात शूज कसे दिसतील याची कल्पना करता येईल आणि जर त्यांना ते आवडले तरच ते खरेदी करू शकतात. ग्राहक हे सर्व बाजून तपासू शकतात. iOS साठी उपलब्ध असलेल्या अॅमेझॉन शॉपिंग अॅपद्वारे ग्राहक शूजसाठी व्हर्च्युअल ट्राय-ऑन हा पर्याय वापरू शकतात असे कंपनीने म्हटले आहे. यामुळे त्याला New Balance, Adidas, Reebok, Puma, Superga, Lacoste, Asics आणि Saucony या सारख्या ब्रँडचे शूज तुम्ही खरेदी करण्यापूर्वी ते ट्राय करू शकतात.

(हेही वाचा – मानवी मृतदेहापासून बनवली गेली औषधे! माहिती वाचून व्हाल थक्क)

लवकरच भारतातही येणार हे फीचर

अॅमेझॉन शॉपिंग अॅपवर शूज निवडल्यानंतर, ग्राहकाला व्हर्च्युअल ट्राय-ऑन बटणावर टॅप करावे लागेल. यासाठी, त्यांना प्रोडक्ट डिटेल्स या पर्यायावर जावे लागेल. यानंतर ग्राहकांना त्यांच्या फोनचा कॅमेरा त्यांच्या पायाकडे न्यावा लागेल. याद्वारे ग्राहक त्यांच्या पायात ते शूज कसे दिसतील हे पाहू शकतील. ग्राहक त्यांचे पाय हलवून सर्व अॅन्गलने ते शूज पाहू शकतात. याशिवाय शूजचा रंगही बदलून ते ट्राय करता येणार आहे. कंपनीने म्हटले आहे की, ग्राहकांना व्हर्च्युअल ट्राय-ऑन या फीटर मध्ये घालून पाहिलेल्या शूजचा फोटो घेण्याचा आणि सोशल मीडियावर मित्रांसोबत शेअर करण्याचा पर्याय देखील असणार आहे. यासाठी त्यांना शेअर आयकॉनवर क्लिक करावे लागेल. असे सांगितले जात आहे की लवकरच हे फीचर भारतात लाँच केले जाऊ शकते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here