फेसबुक उघडलं तर बसेल कानाखाली!

140

इन्टाग्राम,व्हाट्सअॅप, ट्विटर, फेसबुक यांसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉम सतत वापरण्याची सवय अनेकांना असते. त्यामुळे दिवसाचा बराच वेळ सोशल मीडिया वापरण्यात खर्च होतो. या सवयीपासून सुटका मिळवण्यासाठी एका माणसानं चक्क एका बाईला कामाला ठेवलं आहे. या महिलेची आगळी वेगळी नोकरी सध्या चर्चेत असून, जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनीही या फोटोवर आपली रिएक्शन दिली आहे.

कानाखाली मारण्यासाठी महिलेला दिला जातो ‘इतका’ पगार

भारतीय वंशाचे अमेरिकी उद्योजक मनीष सेठी यांनी  प्रत्येकवेळी फेसबुक उघडल्यानंतर त्यांना मारण्यासाठी एका महिलेला कामावर ठेवलं आहे. कारा नावाच्या या महिलेला मनीष यांची स्क्रिन पाहून कानाखाली मारण्यासाठी ८ डॉलर प्रती तास मिळणार आहेत. मनीष सेठी यांनी २०१२ मध्ये या महिलेला कामावर ठेवलं होतं. पण आज ९ वर्षांनी या पोस्टची चर्चा होण्याचं कारण असं की, टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी दोन फायर इमोजीचा वापर करून, यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सेठी यांनी २०१२ च्या जाहिरातीत लिहिलं होतं की, जेव्हा मी माझा  वेळ फेसबुक वापरण्यात वाया घालवत असेन, तेव्हा काराने मला ओरडायला हवं किंवा कानाखाली मारायला हवं.

( हेही वाचा : त्रिपुरातील घटनेच्या विरोधात महाराष्ट्रात मुसलमानांची हिंसा)

सेठींची काम करण्याची क्षमता वाढली

मनीष सेठी यांनी मस्क यांच्या प्रतिक्रियेवर पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे. सेठी यांनी काराला कानाखाली मारून काम करण्याची क्षमता वाढवण्याचं श्रेय दिलं होतं. त्यांच्यामते दिवसभरात त्यांची काम करण्याची क्षमता जवळपास ३५ ते ४० टक्के होती.पण जेव्हापासून कारा सेठींवर नजर ठेवू लागली तेव्हापासून त्यांची क्षमता वाढून ९८ टक्के झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.