भारताचा डंका परदेशात; नाटू नाटू गाण्यावर अमेरिकन पोलिसांचा भन्नाट डान्स

नाटू नाटू या गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आणि भारताची छाती अभिमानाने फुगली. ऑस्कर मिळवण्याआधीच या गाण्याने रसिकांच्या मनावर राज्य केलं होतं. मूळ गीत तर गाजलंच त्याचबरोबर हिंदी गाण्यानेही लोकांना वेड लावलं. भारतीय परंपरा दाखवणारा हा चित्रपट देखील खूप गाजला.

( हेही वाचा : कपिल सिब्बलांचे राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह! सत्तासंघर्षावर गुरूवारी पुन्हा सुनावणी)

भारतातच नव्हे तर जगभरातही या गाण्यावर लोक थिरकताना दिसत आहेत. क्रिकेटर्स, रील्स बनवणारे इतकंच काय तर पोलीस देखील स्वतःला रोखू शकत नाहीत. आता सोशल मीडिआवर एक जबरदस्त व्हिडिओ व्हायरल होतोय.

या व्हिडिओमध्ये चक्क कॅलिफोर्नियाचे पोलिस नाटू नाटू गाण्यावर थिरकताना दिसत आहेत आणि हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेनावथ जगन या ट्विटर हॅंडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. खरंतर अमेरिकेतील होळी पार्टीमध्ये हे नृत्य पोलिसांनी सादर केलं.

पोलिसांचे हे धमाकेदार नृत्य पहा इथे:

या व्हिडिओत दोन पोलिस दिसत आहेत आणि त्यांच्या मध्ये एक व्यक्ती उभी आहे हे तिघं मिळून भारतीय गाण्यावर नृत्याचा आनंद लुटत आहेत. या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद तर मिळत आहे, तसेच भारतीय गाण्याला जगभरात इतका प्रतिसाद पाहून येणार्‍या काळात भारतीय संस्कृतीवर तयार झालेल्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळणार आहे आणि भारतीय कलाकृतीचा डंका जगभरात वाजत राहणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here