Amla Juice Benefits : आरोग्यदायी आवळ्याचा रस

305
Amla Juice Benefits : आरोग्यदायी आवळ्याचा रस
Amla Juice Benefits : आरोग्यदायी आवळ्याचा रस

हिवाळ्यात (Winter Food) अनेक हंगामी भाज्या आणि फळे येतात, जी शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. (Amla Juice Benefits) आवळा त्यांपैकी एक आहे. हे फळ कोणत्याही सुपरफूडपेक्षा कमी नाही. हिवाळ्यात तुम्ही तुमच्या आहारात आवळ्याचा समावेश केला पाहिजे.

आवळ्याच्या रसात अ जीवनसत्व (Vitamin A), क जीवनसत्व (Vitamin C), लोह (Iron), पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि तांबे भरपूर प्रमाणात असते. जर तुम्ही आवळा खाऊ शकत नसाल, तर तुम्ही आवळ्याचा रस पिऊ शकता. आम्ही तुम्हाला हिवाळ्यात आवळ्याचा रस पिण्याचे फायदे सांगणार आहोत. (Amla Juice Benefits)

(हेही वाचा – Chunabhatti Firing : वर्चस्वाच्या लढाईतुन सुमित येरुणकरची हत्या)

  • लठ्ठपणामुळे (obesity) ग्रस्त असलेल्यांसाठी आवळ्याचा रस एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. आवळा अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. तो वजन कमी करण्यास मदत करतो.
  • आवळ्याचा रस प्यायल्याने खराब कोलेस्टेरॉल (bad cholesterol) कमी होण्यास आणि शरीरातील चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढण्यास मदत होते. हिवाळ्यात आवळ्याचा रस प्यायल्याने हृदयाचे आजार दूर रहातात.
  • आवळ्याचा रस हा जीवनसत्व क आणि ई चा चांगला स्रोत आहे. आवळ्याचा रस रोगप्रतिकारक शक्ती (immunity) मजबूत करण्यास मदत करतो. हिवाळ्यात आवळ्याचा रस प्यायल्याने सर्दी, खोकला आणि ताप यासारख्या हंगामी आजारांपासून सुटका मिळते.
  • जर तुमचे डोळे कमकुवत असतील, तर आवळ्याचा रस प्यायला सुरुवात करा. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे डोळ्यांचे आजारही (eye diseases) टाळता येतात.
  • आवळ्याचा रस प्यायल्याने त्वचा उजळते. हे अँटी-इंफ्लेमेटरी (Anti-inflammatory) म्हणून काम करते. यामुळे सुरकुत्या पडणे थांबते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते. हे रक्तातील अशुद्धता काढून टाकते आणि त्वचेला चमकदार बनवते. (Amla Juice Benefits)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.