भारतीय रेल्वेकडून चालवल्या जाणाऱ्या दोन वेगवेगळ्या रूटच्या रेल्वे सेवांना ‘अमरावती एक्सप्रेस’ (amravati express) असं नाव देण्यात आलं आहे.
त्यांतल्या पहिल्या रेल्वे रूटवर धावणाऱ्या रेल्वे पुढीलप्रमाणे :-
- १७२२५ नरसापुरम-हुबळी अमरावती एक्सप्रेस (amravati express) आणि १७२२६ हुबळी-नरसापुरम अमरावती एक्सप्रेस
ही रेल्वे सेवा दररोज दक्षिण मध्य रेल्वे म्हणजेच SCR च्या विजयवाडा या विभागाद्वारे चालवली जाते. ही रेल्वे दक्षिण भारतात आंध्र प्रदेश ते कर्नाटक पर्यंत धावते.
- १८०४७ हावडा-वास्को द गामा अमरावती एक्सप्रेस (amravati express) आणि १८०४८ वास्को द गामा-हावडा अमरावती एक्सप्रेस
ही रेल्वे सेवा आठवड्यातून चार वेळा विशाखापट्टणम, विजयवाडा, गुंटूर, नंद्याल, गुंटकल, बेल्लारी, हॉस्पेट, गदग, हुबळी, धारवाड, लोंडा, मडगाव मार्गे चालते. ही रेल्वे सेवा दक्षिण पूर्व रेल्वे म्हणजेच SER च्या खरगपूर विभागाद्वारे चालवली जाते. ही रेल्वे पश्चिम बंगालमधून भारताच्या पूर्वेकडच्या ओरिसा आणि आंध्र प्रदेशमार्गे कर्नाटक आणि दक्षिण-पश्चिम भारताच्या गोव्यापर्यंत जाते.
अमरावती एक्सप्रेस (amravati express) ही आंध्र प्रदेशातल्या रहिवाशांमध्ये विशेषत: विजयवाडा, गुंटूर, नरसराओपेट, मरकापूर, कुंबम, गिड्डालुरू, नंद्याल, महानंदी, गुंटकल आणि बेल्लारी आणि आसपासच्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे.
(हेही वाचा – Oath Ceremony मध्ये ईव्हीएम मशीनला घेऊन गोंधळ घालण्याची शक्यता; सोहळ्यासाठी येणाऱ्यांची कडक तपासणी)
-
अमरावती एक्सप्रेसचा इतिहास
अमरावती एक्सप्रेस (amravati express) ही ऐतिहासिक मछलीपट्टणम-मुरमुगाव रेल्वे ट्रॅकवर धावते.
१९५० सालच्या दशकामध्ये गुंटूर आणि हुबळी दरम्यान मीटर-गेज ट्रेन म्हणून ही रेल्वे सेवा पहिल्यांदा सुरू झाली होती. गुंटूर-हुबळी जलद रेल्वे प्रवासी सेवेला १९८७ ते १९९० दरम्यान एक्सप्रेस सेवेत अपग्रेड करण्यात आलं. त्यानंतर तिला ‘अमरावती एक्सप्रेस’ असं नाव देण्यात आलं.
त्या रेल्वेचे डबे YP स्टीम लोकोमोटिव्हने नेण्यात आले होते. तसंच त्या रेल्वेमध्ये वास्को द गामा ते गुंटूरपर्यंत स्लिपर कोच होता. गुंटूरला जाणारा हा स्लिपर कोच, गोमंतक एक्सप्रेसला आणि गदगला जाणाऱ्या स्लिपर कोचला जोडण्यात आला होता.
हे स्लिपर कोच नंतर लोंडा इथल्या मिरज गडग लिंक एक्सप्रेसला (amravati express) जोडले गेले. गुंटूरला जाणारा स्लिपर कोच नंतर गडग इथल्या हुबळी-गुंटूर जलद प्रवासी रेल्वे सेवेशी जोडला गेला. स्लिप कोच जोडण्याची आणि विलग करण्याची ही पद्धत गदग या ठिकाणी बंद करण्यात आली. अमरावती एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर स्लिपर कोच हुबळीपर्यंत गेले.
त्यानंतर १९९० सालच्या दशकाच्या मध्यात गेजच्या रूपांतरणाचं काम सुरू होईपर्यंत आणि १९९७ साली रेल्वे ट्रॅक प्रमाणित होईपर्यंत ही पद्धत सुरूच होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community