
-
ऋजुता लुकतुके
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सध्याचे अध्यक्ष आनंद महिंद्रा त्यांच्या उद्योजकतेसाठी जसे ओळखले जातात तसंच सोशल मीडियावरील त्यांच्या प्रेरणादायी वावरामुळेही ही भारतीय तरुणांशी जोडले गेले आहेत. त्यांचे दर सोमवारी पडणारे संदेश तर लोक आवर्जून वाचतात. शिवाय खासकरून तरुणांनी निवडलेल्या वेगळ्या वाटा आणि त्यात मिळवलेलं यश यांचंही ते सोशल मीडियावर कौतुक करतात. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने वाहन उद्योग, बांधकाम उद्योग, माहिती तंत्रज्ञान, संरक्षण आणि आतिथ्य व्यवस्थापन या क्षेत्रात मोठी मजल मारली आहे आणि आनंद महिंद्रा यांची समुहाचे अध्यक्ष म्हणून एकूण मालमत्ता १७,००० कोटी रुपयांच्या घरात आहे. (Anand Mahindra Net Worth)
(हेही वाचा – ODI Highest Sixes : एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार कुणाच्या नावावर आहेत?)
भारतातील श्रीमंतांच्या यादीत ते कायम पहिल्या शंभरात असतात आणि खासकरून महिंद्रा कार कंपनीला त्यांच्या काळात नवनवीन मॉडेलमुळे भरभराट आली आहे. त्यांच्या समुहात सध्या १३७ वेगवेगळ्या कंपन्या आहेत. इतकी मालमत्ता असलेल्या आनंद महिंद्रा यांना मुंबईत कुठेही महागडं घर बांधणं शक्य आहे आणि ते अजूनही आपल्या जुन्या आजोबांच्या काळातील घरातच राहतात. त्यांचे आजोबा जगदीशचंद्र महिंद्रा यांनी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची स्थापना केली. मुंबईतील नेपियन्सी रोडवरील ही छोटी बंगली आजोबांनी भाड्याने घेतली तेव्हा आनंद यांचा जन्मही झाला नव्हता. पण, तिथून हळू हळू महिंद्रा कुटुंबीयांची भरभराट सुरू झाली आणि आनंद यांचा जन्मही इथेच झाला. महिंद्रा कुटुंबीय इथं एकत्र राहत होते. (Anand Mahindra Net Worth)
(हेही वाचा – Ranveer Allahbadia : खरोखरच अतिशय निर्लज्ज…)
आनंद यांचं बालपण या घरातच गेलं. त्यामुळे त्यांच्या आठवणी या जागेशी निगडीत आहेत. पुढे धरमालकांनी घराच्या दुरुस्तीचा किंवा ते पाडून नवीन इमारत उभी करण्याचा प्रस्ताव ठेवला तेव्हा आनंद यांनी एकट्याने ते अख्खं घर २७० कोटी रुपयांना विकत घेतलं आणि त्याची डागडुजी केली. १३,००० वर्गफुटांच्या या टुमदार घराला आनंद यांनी नाव दिलं आहे – ‘गुलिस्तान.’ गुलिस्तान म्हणजे फुलांचा बगिचा. आनंद यांनी घराची रचना पूर्वी आहे तशीच ठेवली आहे. पण, नावाप्रमाणेच भरपूर झाडं आणि वृक्षांची लागवड केली आहे. आपली पत्नी अनुराधा महिंद्रा यांच्यासह ते या बंगल्यात राहतात. त्यांच्या दोन्ही मुली अविका आणि दिव्या या परदेशात राहतात. दोघीही स्वतंत्रपणे पत्रकारिता करतात. त्यांचा महिंद्रा समुहाच्या दैनंदिन कारभारात सहभाग नाही. (Anand Mahindra Net Worth)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community