Anant Ambani Wedding Gifts : बुगाटी कार आणि समुद्रकिनाऱ्यासमोरील व्हिला, अनंत आणि राधिकाला मिळालेल्या १५ विवाह भेटी

Anant Ambani Wedding Gifts : ॲमेझॉनचे माजी अध्यक्ष जेफ बेझॉस यांनी अनंत आणि राधिका यांना ११.३० कोटींची बुगाटी भेट म्हणून दिली आहे. 

148
Anant Ambani Wedding Gifts : बुगाटी कार आणि समुद्रकिनाऱ्यासमोरील व्हिला, अनंत आणि राधिकाला मिळालेल्या १५ विवाह भेटी

मुकेश व नीता अंबानी यांचा सगळ्यात धाकटा मुलगा अनंत अंबानीने अलीकडेच राधिका मर्चंट या आपल्या जुन्या मैत्रिणीशी लग्नगाठ बांधली. त्यांचा हा विवाह सोहळा काही दिवस सुरू होता. आणि भारतातील तसंच जगभरातील सेलिब्रिटींनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. हा सोहळाच इतका श्रीमंती आणि थाटामाटाचा होता की, नवीन जोडप्याला मिळालेल्या भेटवस्तूंची कल्पना त्यातून येऊ शकते. इन्स्टाग्राम आणि इतर सोशल माध्यमांवर आलेल्या व्हीडिओंमधून त्यांना मिळालेल्या उंची भेटवस्तूंची माहिती आपल्याला मिळते. नजर टाकूया १५ मौल्यवान भेटवस्तू ज्या अनंत आणि राधिका यांना मिळाल्या. (Anant Ambani Wedding Gifts)

१. पाम जुमैरा इथं खाजगी समुद्रकिनारा असलेली व्हिला

ही भेट दोघांना अनंतचे वडील मुकेश अंबानी यांच्याकडूनच मिळाली. ३,००० वर्गफुटांचा हा व्हिला आहे. आणि यात १० बेडरुम तसंच घरासमोर खाजगी समुद्रकिनाराही आहे. ६,४०० कोटी रुपये इतकी या व्हिलाची किंमत आहे. (Anant Ambani Wedding Gifts)

२. बेंटली कॉन्टिनेन्टल

मुकेश आणि नीता अंबानी यांनी फक्त व्हिलाच नाही तर दोघांना बेंटली कॉन्टिनेन्टल जीटीसी स्पीड कारही भेट दिली आहे. या कारची किंमत ५.४२ कोटी रुपये इतकी आहे.

३. कार्टिअर ब्रूच व हिऱ्याचा चोकर

नीता अंबानी यांनी आपल्या सूनेला २१.७ कोटी रुपये किमतीचा कार्टिअर ब्रूच तसंच मोती व हिऱ्यांनी जडलेला १०८ कोटी रुपयांचा चोकर भेट दिला आहे.

४. बुगाटी

ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांनी नवदाम्पत्याला ११.५ कोटी रुपयांची बुगाटी भेट दिली आहे. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. (Anant Ambani Wedding Gifts)

५. लँम्बॉर्गनी

अमेरिकन स्टार आणि डब्ल्यूडब्ल्यूईचा दिग्गज स्पर्धक जॉन सेन्नाने अनंत व राधिका यांना ३ कोटी रुपयांची लँम्बॉर्गिनी भेट दिली आहे.

६. खाजगी जेट

मेटा कंपनीचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी नवदाम्पत्याला ३०० कोटी रुपयांचं खाजगी जेट भेट केलं आहे.

७. हिऱ्याची अंगठी व यॉट

मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक व एकेकाळचे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले बिल गेट्स यांनी अनंत व राधिका यांना ९ कोटी रुपयांची एक अंगठी तसंच १८० कोटी रुपयांची यॉट भेट केली आहे.

(हेही वाचा – MVA जागावाटप समितीत काँग्रेसकडून १० जणांची वर्णी; सुशीलकुमार शिंदे, विश्वजीत कदमांना डच्चू)

८. हँडमेड शाल

बॉलिवूड स्टार सिद्धार्थ मल्होत्रा व पत्नी कियारा अडवाणी यांनी नव दाम्पत्याला हाताने विणलेली २५ लाख रुपयांची शाल दिली आहे. (Anant Ambani Wedding Gifts)

९. सोन्याची चेन

विकी कौशल व कटरिना कैफ यांनी अनंत व राधिका यांना १८ लाख रुपये किमतीची सोन्याची चेन भेट दिली आहे.

१०. सोन्याचं पेन

बॉलिवूड स्टार अक्षय कुमारने दोघांना सोन्याचं पेन ज्याची किंमत ६० लाख रुपये आहे, भेट म्हणून दिलं आहे.

११. पॅरिसमध्ये फ्लॅट

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने राधिका व अनंत यांना फ्रान्समध्ये एक अद्ययावत फ्लॅट भेट दिला आहे. आणि या फ्लॅटची किंमत ४० कोटी रुपये इतकी आहे. (Anant Ambani Wedding Gifts)

१२. पाचूंचा नेकलेस

बच्चन कुटुंबीयांनी ३० कोटी रुपये किमतीचा एक पाचूंचा नेकलेस राधिका अंबानीला भेट दिला आहे.

१३. मर्सिडिझ

रणधीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी अनंत व राधिका यांना ९ कोटी रुपयांची मर्सिडिझ कार भेट केली आहे.

१४. स्पोर्ट्स बाईक

सलमान खानने अनंत अंबानीला १५ कोटी रुपयांची स्पोर्ट्स बाईक भेट दिली आहे.

१५. रोल्स रॉईस

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी अनंत व राधिकासाठी कस्टमाईझ्ड रोल्स रॉईस भेट केली आहे. या गाडीची किंमत २० कोटी रुपये आहे. (Anant Ambani Wedding Gifts)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.