अंधारबन हे नावाप्रमाणेच ‘घनदाट जंगल’ आहे. हा ट्रेक जास्त करून पावसाळ्यात करण्यात येतो. अंधारबन ट्रेक (andharban trek) हा सह्याद्री पर्वत रांगांच्या सर्वात रिफ्रेशिंग ट्रेकपैकी एक आहे. ताम्हिणी घाटाच्या प्रदेशाला कोकण प्रदेशाशी जोडणारं सह्याद्रीच्या पर्वत रंगांमधलं हे सर्वात सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे.
महाराष्ट्रातल्या पुणे शहरापासून पिंपरी येथे हे अंधारबनचं जंगल ट्रेक आहे. अंधारबन ट्रेक हे प्रत्येक ट्रेकरसाठी योग्य ठिकाण आहे. ज्या ट्रेकर्सना मनमोहक दृश्ये आणि घनदाट जंगलात भटकण्याचा आनंद घ्यायचा आहे, त्यांनी आवर्जून हा ट्रेक करायला हवा. पाण्याचा खळखळाट, पक्ष्यांचा किलबिलाट, पानांचा सळसळाट, किटकांचा किर्रर्र आवाज आणि खडकांवरून वाहणारे धबधबे यांनी वेढलेल्या जंगलात आतवर असलेल्या निसर्गाच्या पायवाटेवरून चालणं किती आनंददायी असेल नाही? अंधारबन-द डार्क फॉरेस्ट ट्रेक हा सर्व आनंद प्रदान करतो!
(हेही वाचा – काँग्रेस- शरद पवार गटाने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा; मी त्याला पाठिंबा देतो – Uddhav Thackeray)
अंधारबन हे बॅगपकर्सचं नंदनवन
अंधारबन ट्रेकसाठी (andharban trek) जर तुम्ही पावसाळ्यात गेलात तर हिरवेगार गवत आणि घनदाट जंगलाच्या सावलीतुन चालण्याचा आनंद घेता येईल. दाट धुक्याने झाकलेल्या या जंगलातून फिरताना तुम्हाला कुंडलिका खोऱ्याची विलक्षण दृश्यं पाहायला मिळतील. याव्यतिरिक्त इथे तुम्हाला पाण्याचे लहान-मोठे झरे दिसतील आणि उंचावरून खळखळत पडणाऱ्या धबधब्यांचे आवाज ऐकू येतील. एका बाजूला तुम्हाला दरी असलेले मोठे जलप्रवाह पार करावे लागतील आणि दुसऱ्या बाजूला मनमोहक धबधबा पहायाला मिळेल. या रहस्यमय जंगलातून चालताना तुम्हाला प्रत्येक वळणावर नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.
अंधारबन (andharban trek) हे बॅगपकर्सचं नंदनवन म्हणून ओळखलं जातं. अंधारबनातून चालताना तुम्हाला कुंडलिका व्हॅली, भिरा धरण आणि ताम्हिणी घाटाच्या विविध पर्वतरांगांचे विस्मयकारक दृश्य नजरेला दिसेल. इथल्या दरीच्या विस्मयकारक दृश्यांव्यतिरिक्त, तुम्हाला या ठिकाणी अनेक अद्वितीय वनस्पती, प्राणी आणि पक्ष्यांच्या अनेक प्रजाती पाहायला मिळतील. जसं की, जेकोबिन कोकीळ, मलबार व्हिसलिंग थ्रश, छोटे किंगफिशर्स आणि स्थानिक स्वदेशी मिनिवेट्स देखील इथे पाहायला मिळतील. या ठिकाणाला खऱ्या अर्थाने सह्याद्रीचा स्वर्ग म्हणता येईल. अंधारबनच्या जंगलात मान्सून ट्रेकवर गेलात तर आयुष्यातला एक सुंदर अनुभव तुम्हाला घेता येईल. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर हा ठिकाणाला नक्की भेट द्या.
(हेही वाचा – tikona fort : तिकोना किल्ला का आहे इतका प्रसिद्ध?)
कुंडलिका नदीचं हे आहे उगमस्थान
अंधारबनात जेव्हा तुम्ही ट्रेकिंगला सुरुवात करता तेव्हा ते जंगल प्रकाशाने खूप उजळलेलं दिसेल. पण जसजसं तुम्ही पुढे चालत जाल तसतसं तुम्हाला असं दिसून येईल की, तिथल्या सदाहरित झाडांच्या सावल्या तुमच्या पायवाटा झाकून टाकत आहेत. हळूहळू उजेडाचं रूपांतर अंधारात व्हायला लागतं. या घनदाट जंगलात पहिले ६-७ किलोमीटरपर्यंत सामान्य पायवाट आहे. पण जेव्हा तुम्ही कुंडलिका व्हॅलीच्या अगदी बाजूला चालता तेव्हा तुमच्या उजवीकडे डोंगररांगांच्या काठावरून तुम्हाला चालावं लागेल. तुमच्या संपूर्ण ट्रेकमध्ये तुम्हाला ३ प्रमुख नदी नाले दिसतील. त्यांपैकी काहींना पावसामुळे प्रवाह जास्त असला तर ते पार करण्यासाठी दोरी किंवा मानवी साखळी आवश्यक असू शकते.
पुढे चालत आल्यावर तुम्हाला ‘हिरडी’ नावाचं एक दुर्गम आणि सुंदर गाव लागेल. अंधारबन ट्रेकच्या (andharban trek) दरम्यान तुम्हाला दिसणारं हे एकमेव गाव आहे. तुम्ही इथल्या स्थानिक लोकांकडून जेवणाची व्यवस्था करून घेऊ शकता. तसंच भिरा येथे जाण्यासाठी कोकण मार्गावर उतरण्याआधी तुम्ही या ठिकाणी नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी थांबू शकता. ही व्हॅली म्हणजे कुंडलिका नदीचं उगमस्थान आहे. हे ठिकाण व्हाईट-वॉटर रिव्हर राफ्टिंग आणि इतर साहसी वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध आहे. या ट्रेकचा दुसरा भाग अंदाजे ४-५ किलोमीटर एवढा आहे. सपाट पृष्ठभागावर ट्रेकिंग करत आणि भिरा धरणाच्या बॅकवॉटरच्या निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेत तुम्ही थोड्याच वेळात पायथ्याजवळच्या गावात पोहोचाल.
(हेही वाचा – chaturbhuj temple : ओरछा येथील चतुर्भुज मंदिराबद्दल जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी!)
हा ट्रेक म्हणजे खरोखरच आयुष्यभरासाठी असलेला विलक्षण अनुभव ठरेल!
अंधारबनला भेट देण्याची उत्तम वेळ :
अंधारबन ट्रेक हा वर्षभर खुला असतो. तरीही जेव्हा पूर्णपणे उजाड झालेल्या डोंगररांगांवर हिरव्यागार गवताची पालवी फुटते तेव्हा या सुंदर पश्चिम घाटात ट्रेकला जाण्याची मज्जाच काही और असते. जून-सप्टेंबर महिन्यांत अंधारबन ट्रेकचं नियोजन करण्याची सर्वोत्कृष्ट वेळ आहे. पावसाळ्यादरम्यान ट्रेकिंग करणं ही एक चांगली कल्पना आहे. कारण या काळामध्ये अंधारबनचं जंगल अतिशय घनदाट असतं आणि त्यात थंडी आणि गूढरित्या वाहणाऱ्या वाऱ्याची भर पडते.
ट्रेकचा तपशील :
- ट्रेकचं स्थळ : पिंपरी, ताम्हिणी घाट, महाराष्ट्र
- ट्रेकची कठीण पातळी : हा एक मध्यम-स्तरीय ट्रेक आहे. तो पूर्ण करण्यासाठी विलक्षण सहनशक्तीची आवश्यकता आहे. या ट्रेकचा एकमेव धोकादायक टप्पा म्हणजे पावसाळ्यात नदी खवळलेली पाण्याचे ओलांडणे.
- ट्रेकचं अंतर : १३ किलोमीटर पायवाट
- ट्रेकची उंची : २१६० फूट
- ट्रेकचा प्रकार : जंगल/व्हॅली डिसेंड ट्रेक
- ट्रेकचा कालावधी : हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी अंदाजे ६ ते ७ तास लागतात. ज्यामध्ये हिरडी गावात लंच ब्रेकचाही समावेश असतो.
- मुंबईपासून अंधारबन अंतर : १३३ किलोमीटर
- लोणावळ्यापासून अंधारबन अंतर : ४८ किलोमीटर (andharban trek)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community