सिरो सर्वेक्षण! ९० टक्क्यांहून अधिक ठाणेकरांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज

119

बीएमसी व्यतिरिक्त ठाण्यात पहिल्यांदाच सिरो सर्वेक्षण करण्यात आले आहे. ठाण्यात करण्यात आलेल्या सिरो सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ठाण्यातील ९० टक्क्यांहून अधिक रहिवाशांमध्ये कोव्हिड विषाणूच्या अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या अहवालात देण्यात आली ठाणे हे पहिले नागकी महामंडळ असून ज्या शहराने सिरो सर्वेक्षण केले आहे. तर आतापर्यंत मुंबईने पाच सिरो सर्वेक्षण केले होते. त्यापैकी शेवटचे सिरो सर्वेक्षण तीन महिन्यांपूर्वी केले असून त्या सर्वेक्षणात ८६ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आले आहेत.

सर्वेक्षणाचा अहवाल दिलासादायक

ठाणे महापालिका क्षेत्रात सिरो सर्वेक्षण करण्यात आला. या क्षेत्रात करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा निकाल म्हणजे ९१ टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत, अशी माहिती ठाण्याचे महापौर नरेश मस्के यांनी दिली. यासह ते पुढे असेही म्हणाले की, सिरो पॉझिटिव्हिटी ९०.६ % असली तरी, कोरोना अजूनही पूर्णपणे गेलेला नाही, आम्ही चाचणी आणि ट्रेसिंगद्वारे लक्ष ठेवून आहोत. महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ऑक्टोबरमध्ये ठाणे महापालिकेने प्रत्येक नऊ वॉर्डमधून तसेच इमारती आणि झोपडपट्ट्यांमधून नमुने गोळा केले. सर्वेक्षण केलेल्यांपैकी सुमारे २२ टक्के जण ६ ते १८ वयोगटातील अल्पवयीन होते.

(हेही वाचा – दिंडीत भरधाव पिकअप घुसला; २० पेक्षा जास्त वारकरी जखमी, दोघांचा मृत्यू)

यावेळी त्यांनी ठाणे महापालिकेचे प्रशासन, लोकप्रतिनीधी, आरोग्य यंत्रणेसह कर्मचाऱ्यांचे आभार मानले. ठाण्यात करण्यात आलेल्या महापालिकेच्या सिरो सर्वेक्षणचा दिलासादायक अहवाल समोर आला असून त्यातून असे समोर आले की, इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये ९३.३२ टक्के अँटीबॉडीज आढळल्या तर झोपडपट्टी परिसरातील नागरिकांमध्ये ८८.१२ टक्के आढळल्या अँटीबॉडीज आढळल्या आहेत. यासह स्त्रियांमध्ये ९१.११ टक्के अँटीबॉडीज तर पुरुषांमध्ये ८९.६१ टक्के अँटीबॉडीज आणि ६ ते १७ वयोगटात ८३.४३ टक्के अँटीबॉडीज आढळल्या आहेत.

घनदाट भागातील लोकांमध्ये अँटीबॉडीज अधिक

समोर आलेल्या माहितीनुसार, उथळसर आणि लोकमान्य सावरकर नगर सारख्या घनदाट भागातील रहिवाशांमध्ये माजिवडा-मानपाडा येथील भागात राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत अँटीबॉडीजचे प्रमाण अधिक दिसून आले आहेत. येथे लोकसंख्या उथळसर आणि लोकमान्य सावरकर नगरपेक्षी तुलनेने कमी आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.