-
ऋजुता लुकतुके
ओपोलो हॉस्पिटलच्या शेअरमध्ये या आठवड्यात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. पाच दिवसांत हा शेअर ७ टक्क्यांनी घसरला आहे. विशेष म्हणजे तिमाही निकाल चांगले असूनही ही पडझड झाली आहे. मंगळवारी तिमाही निकाल जाहीर झाल्यापासून या नफारुपी विक्री सुरू झाल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. चेन्नई स्थित या कंपनीने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करताना गेल्यावर्षी याच तिमाहीच्या तुलनेत ६७२ कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. तर आरोग्यसेवेतून मिळणारा महसूलही १४ टक्क्यांनी वाढला आहे. (Apollo Hospital Share Price)
इतकंच नाही तर या कामगिरीने खुश होईन कंपनीच्या संचालक मंडळाने शेअर धारकांना प्रती शेअर ९ रुपयांचा लाभांशही जाहीर केला आहे. १५ फेब्रुवारीला तुमच्या खात्यात असलेल्या कंपनीच्या शेअरवर तुम्हाला हा लाभांश लागू होईल. असं असताना हा शेअर मात्र शुक्रवारी बाजार बंद होताना ११२ अंशांच्या पडझडीसह ६,२२५ वर बंद झाला आहे. यात जवळ जवळ २ टक्क्यांची घसरण झाली आहे. (Apollo Hospital Share Price)
(हेही वाचा – बॉलिवूडचे कलाकार हे आपल्या आयुष्यातील हिरो असता कामा नये; Sameer Wankhede यांनी विद्यार्थ्यांना दिला संदेश)
कंपनीच्या देशभरातील रुग्णालयांमध्ये मिळून ७,९९६ खाटा या डिसेंबर २०२४ ला भरलेल्या होत्या. हे प्रमाणही गेल्या तिमाहीच्या तुलनेत वाढलेलं आहे. तर कंपनीने तिमाही निकाल जाहीर करताना आगामी ४ वर्षांत ११ ठिकाणी नवीन ३,५१२ बेड्सची उपलब्धता वाढवणार असल्याचं म्हटलं आहे. (Apollo Hospital Share Price)
तरीही सध्या हा शेअर घसरत आहे. याची दोन कारणं आहेत. जून २०२२ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत अपोलो हॉस्पिटल या शेअरने नेत्रदीपक कामगिरी केली आहे आणि हा शेअर जवळ जवळ १०० टक्क्यांनी वर चढला आहे. तर मागच्या सात वर्षांत यात ४०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता थोडी नफारुपी विक्रीची वेळ झाल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. तसंच या आठवड्यात अदानी समुहाने मुंबई आणि बंगळुरू इथं दोन मोठ्या आरोग्यसुविधाविषयक कॅम्पसची घोषणा केली आहे. त्या संभाव्य स्पर्धेमुळे शेअरवर हा अचानक दबाव आला आहे. फक्त अपोलो हॉस्पिटलच नाही तर मॅक्सकेअर, यथार्थ अशा सगळ्यात हॉस्पिटल शेअरमध्ये ४ टक्क्यांपर्यंतची घसरण झाली आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अजूनही तज्ज या शेअरच्या बाबतीत सकारात्मक आहेत. (Apollo Hospital Share Price)
(डिस्क्लेमर-शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीवर शेअर बाजारात गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी वा गुंतवणुकीवर सल्ला देत नाही. लेखातील मतं जाणकारांची वैयक्तिक मतं आहेत.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community