Apollo Pharmacy : आधुनिक उपचार परवडणाऱ्या दरांत उपलब्ध करण्यासाठी त्यांनी सुरू केली हॉस्पिटल साखळी

Apollo Pharmacy : पेशाने डॉक्टर असलेल्या प्रताप रेड्डी यांनी अपोलो फार्मसी आणि हॉस्पिटलचं साम्राज्य उभं केलं आहे 

100
Apollo Pharmacy : आधुनिक उपचार परवडणाऱ्या दरांत उपलब्ध करण्यासाठी त्यांनी सुरू केली हॉस्पिटल साखळी
Apollo Pharmacy : आधुनिक उपचार परवडणाऱ्या दरांत उपलब्ध करण्यासाठी त्यांनी सुरू केली हॉस्पिटल साखळी
  • ऋजुता लुकतुके 

कार्डिओलॉजिस्ट म्हणजेच ह्रदयरोग तज्ज म्हणून अमेरिकेतील विविध रुग्णालयांमध्ये काम करत असताना प्रताप चंद्र रेड्‌डी या चेन्नईतील हुशार, अभ्यासू स्कॉलरला नेहमी वाटायचं या सगळ्या वैद्यकीय सुविधा भारतात आणि त्या ही परवडणाऱ्या दरात कधी उपलब्ध होतील? तो काळ १९७० चा होता. खरंतर प्रताप चंद्रा रेड्डी बोस्टन इथं अद्ययावत रुग्णालयात स्थिरावले होते. जवळ जवळ २० वर्षं ते अमेरिकेतच काम करत होते. पण, १९७१ मध्ये वडिलांनी घरगुती समस्यांमुळे त्यांना भारतात परत बोलावलं. आणि प्रताप परतले ते एक मनसुबा मनात घेऊनच. (Apollo Pharmacy)

(हेही वाचा- MG Gloster 2024 : एमजी ग्लॉस्टर फेसलिफ्ट दिसली भारतीय रस्त्यांवर, पुढील महिन्यात होणार लाँच )

अमेरिकेतील सुविधा गरिबांनाही परवडतील अशा दरात त्यांना उपलब्ध करून द्यायच्या होत्या. आणि फक्त एकाच ठिकाणी नाही तर देशभरात जमेल तिथे. त्यातूनच १९८३ मध्ये चेन्नईत पहिलं १५० खाटा असलेलं अपोलो रुग्णालय उभं राहिलं. तिथून कंपनीचा प्रवास हा पुढे सुरूच राहिला. कंपनीच्या वेबसाईटनुसार, आता २०२४ पर्यंत ओपोलो हॉस्पिटल ही देशातील पहिली खाजगी रुग्णालयांची एक साखळीच उभी राहिली आहे. आणि ६४ रुग्णालयांतून एकूण १०,००० खाटांची रुग्णालयं विविध ठिकाणी उभी राहिली आहेत. ४,००० तज्ज डॉक्टर आणि ६५,००० तंत्रज्ज इथं काम करत आहेत.  (Apollo Pharmacy)

रुग्णालयांनी आतापर्यंत १२० देशांतील ४२ लाख रुग्णांना सेवा दिली आहे. रुग्णालयांसाठी लागणारी औषधांची गरज भरून काढण्यासाठी प्रताप रेड्डी यांनी सुरुवातीला ऑनलाईन आणि नंतर प्रत्यक्ष दुकानांच्या रुपात फार्मसी सुरू केली. आणि आता अपोलो फार्मसीचा पसाराही १०,००० कोटी रुपयांच्या महसूलापर्यंत पोहोचला आहे. दरवर्षी ४५० ते ५०० नवीन फार्मसींची स्थापना होत आहे.  (Apollo Pharmacy)

(हेही वाचा- Ghatkopar hoarding case मधील आरोपी भावेश भिंडेला जामीन मंजूर!)

प्रताप चंद्रा रेड्डींनी द्रष्टेपणाने सुरू केलेल्या या साखळीला आतापर्यंत चांगलं यश मिळालं आहे. १९३३ मध्ये चेन्नईत जन्मलेले प्रताप रेड्डी चेन्नईच्या स्टॅनली वेद्यकीय कॉलेजमधून एमबीबीएस झाले. आणि त्यानंतर उच्चशिक्षणासाठी त्यांनी आधी युके आणि मग अमेरिका गाटली. तेव्हापासून खरंतर ते अमेरिकेत वास्तव्याला होते. पण, त्याचवेळी अद्ययावत रुग्णसेवा भारतात आणायची त्यांची इच्छा सुरुवातीपासून होती.  (Apollo Pharmacy)

इतकंच नाही तर रोगांवर उपचाराबरोबरच रोग होऊच नये म्हणून प्रतिबंधक उपाययोजना करायची हे त्यांचं मुख्य धोरण होतं. त्यांच्या प्रयत्नांतूनच अपोलो प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअर प्रणाली भारतात सुरू झाली. आणि या सुविधा देणारी अपोलो ही पहिली कंपनी होती. त्यांच्या या योगदानासाठी इंडिया टुडेनं २०१७ मध्ये भारतातील ५० प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांमध्ये प्रताप रेड्डींचा समावेश केला होता. १९९१ मध्येच केंद्रसरकारने त्यांना तिसऱ्या क्रमांकावरील नागरी पुरस्कार पद्मभूषण देऊन गौरवलं होतं. तर २०१० मध्ये त्यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. (Apollo Pharmacy)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.