- ऋजुता लुकतुके
ॲपल कंपनीने (Apple Company) जवळ जवळ १८ महिन्यांच्या विश्रांतीनंतर आपली दोन आयपॅड प्रो मॉडेल बाजारात आणली आहेत. यावेळी कंपनीने एम४ या अद्ययावत चिपचा वापर केला आहे. शिवाय यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापरही झाला आहे. आयपॅड प्रोचे ११ आणि १३ इंचांची दोन मॉडेल ही २५८ जीबी, ५१२ जीबी, १ टेराबाईट आणि २ टेराबाईट असा स्टोरेज क्षमतेसह उपलब्ध होतील. चंदेरी आणि स्पेस ब्लॅक रंगांचा पर्याय या प्रो सीरिजसाठी देण्यात आला आहे. (Apple iPad Pro)
पण, या दोन्ही मॉडेलची किंमत बघितली तर तुम्ही थक्क व्हालं. कारण, ११ इंचांचा आयपॅड प्रो तुम्हाला मिळेल ९९,००० रुपयांना. तेच वाय-फायसह सेल्युलर सेवाही घेतलीत तर हीच किंमत १,१९,००० लाखांवर जाते. १३ इंचांच्या मॉडेलची किंमतच १.२९ लाखांपासून सुरू होते. हे आयपॅड प्रो (iPad Pro) तुम्ही नवीन आयपेन्सिल आणि आयकीबोर्डसह वापरू शकता. ॲपलचा नवीन मॅजिक की-बोर्ड २९,९०० रुपयांना तुम्हाला मिळू शकेल. तर १३ इंचांसाठीचा की-बोर्ड ३२,००० रुपयांना मिळेल. (Apple iPad Pro)
(हेही वाचा – IPL 2024 DC vs RR : कुलदीप यादवने आपल्या फिरकीने राजस्थानला विजय नाकारला)
ॲपलने पहिल्यांदाच वापरला एम४ चिपसेट
नवीन प्रो सीरिजमध्ये ॲपल कंपनीने (Apple Company) अल्ट्रा रेटिना एक्सडीआर डिस्प्ले वापरला आहे. तर स्क्रीनची प्रखरता वाढवण्यासाठी ओएलईडी डिस्प्ले असला तरी दोन्ही बाजूनी त्यावर झोत येणार आहेत. त्यामुळे चित्र आणखी सुस्पष्ट दिसेल. एसडीआर प्रतीच्या व्हिडिओसाठी आयपॅड प्रोची प्रखरता १००० नीट्स इतकी असेल. तर एचडीआर व्हिडिओसाठी ती १,६०० नीट्स पर्यंत पोहोचेल. (Apple iPad Pro)
आयपॅड प्रोच्या निमित्ताने ॲपलने (Apple) पहिल्यांदाच एम४ चिपसेट वापरला आहे. यापूर्वी एम सीरिज चिपसेट पहिल्यांदा मॅकबुकमध्ये वापरले गेले होते. एम४ हा ॲपलचा सगळ्यात वेगवान चिपसेट आहे. एम२ च्या तुलनेत एम ४ एखादं काम निम्म्या वेळेत करू शकेल आणि ऊर्जाही निम्मीच खर्च होईल. चिपसेटच्या क्षेत्रात एम४ चिप क्रांती करेल असा विश्वास ॲपलला वाटतो. (Apple iPad Pro)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community